आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक जण शारीरिक आणि मानसिक त्रासाने हैराण आहेत. शिवाय बैठी जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे. शारीरिक हालचाल कमी झाली की, लठ्ठपणा यासह गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे पाठदुखीची (Back Pain) समस्या निर्माण होते. पाठदुखीचा त्रास आपल्याला सामान्य जरी वाटत असला तरी, या दुखण्यामुळे आपले कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही (Healthy Powder). या दुखण्याकडे लक्ष न दिल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते (Homemade Back Pain Remedy).
या समस्येवर मात करण्यासाठी आपण नियमित एक चमचा हेल्दी पावडर खाऊ शकता. या पावडरमधील पौष्टीक घटकामुळे हाडांना बळकटी मिळेल. शिवाय पाठदुखीचा त्रासही कमी होईल(Just 1 TBSP Everyday For Back Pain - Homemade Back Pain Remedy).
पाठदुखीवर उपाय म्हणून रोज खा एक चमचा हेल्दी पावडर
लागणारं साहित्य
तूप
डिंक
बदाम
अक्रोड
पिस्ता
खजूर
सूर्यफुलाच्या बिया
स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? लग्न न मोडता घटस्फोट घेण्याची ही कोणती नवी पद्धत?
अळशीच्या बिया
चिया सीड्स
खसखस
पांढरे तीळ
बडीशेप
मखाणा
रवा
सुकं खोबरं
मनुके
गुळ
भाजलेले चणे
वेलची पूड
कृती
सर्वप्रथम, पॅनमध्ये दोन चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात २ चमचा डिंक घाला. डिंक फुलल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात अर्धा कप बदाम, एक कप अक्रोड, अर्धा कप पिस्ता आणि ५ सुके खजूर घालून सर्व साहित्य मध्यम आचेवर भाजून घ्या. ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
नंतर दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा कप सूर्यफुलाच्या बिया, अर्धा कप भोपळ्याच्या बिया, अर्धा कप अळशीच्या बिया, २ टेबलस्पून चिया सीड्स, २ चमचे खसखस, २ चमचे पांढरे तीळ आणि २ चमचे बडीशेप घालून साहित्य मध्यम आचेवर भाजून घ्या. भाजून घेतलेलं साहित्य एका बाऊलमध्ये काढून घ्या.
आता पॅनमध्ये एक कप मखाणा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या, व एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच प्लेटमध्ये सर्व साहित्य एकत्र करून हाताने मिक्स करा, व अर्ध साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून खडबडीत पावडर तयार करून घ्या, व अर्धे ड्रायफ्रुट्स एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...
दुसरीकडे पॅनमध्ये २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर एक कप बारीक रवा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा कप मनुके घालून भाजून घ्या, व भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये एक कप किसलेला गुळ आणि पाणी घालून मिक्स करा.
गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्यात भाजलेल्या रव्याचे साहित्य, ड्रायफ्रुट्स पावडर, एक कप भाजलेले चणे, कपभर भाजलेले ड्रायफ्रुट्स, अर्धा चमचा वेलची पूड घालून साहित्य एकजीव करा, थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात काढून घ्या. अशा प्रकरे पाठदुखीवर असरदार उपाय अर्थात बॅक पेन रेमिडी पावडर खाण्यासाठी तयार. आपण रोज एक चमचा खाऊ शकता. यातील पौष्टीक घटक नक्कीच पाठदुखीच्या त्रासापासून आराम देतील.