Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health : जेवल्यानंतर शतपावली करावी असं वडिलधारे सांगतात ते नक्की ऐका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 10:40 AM2023-09-22T10:40:36+5:302023-09-22T10:45:02+5:30

Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health : जेवल्यानंतर शतपावली करावी असं वडिलधारे सांगतात ते नक्की ऐका

Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health | रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

रात्री जेवल्यानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली, वजन कमी आणि शुगर कण्ट्रोल करण्यासाठी सोपा उपाय

दिवसभराच्या थकव्यानंतर बरेच लोकं डिनर करून थेट बेडरूम गाठतात. जेवल्यानंतर लगेच झोपतात. असे केल्याने क्षणिक आनंद आपल्याला मिळतो, पण आरोग्याचं काय? जेवण केल्यानंतर नकळत घडणाऱ्या चुकांमुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. तंदुरुस्त राहण्यासाठी जेवण केल्यानंतर शतपावली करण्याचा सल्ला दिला जातो. चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे वजन तर नियंत्रित राहतेच, शिवाय पचनक्रियाही सुधारते.

मधुमेहग्रस्त रुग्णांना जेवण केल्यानंतर चालण्याचा सल्ला दिला जातो. आयर्लंडच्या लिमेरिक विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, 'जेवण केल्यानंतर फक्त २ मिनिटे चालणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते'(Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health).

रिसर्च काय सांगते?

स्टडीनुसार जेवल्यानंतर चालणे महत्वाचे आहे. जेवणानंतर २ मिनिटं चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. टाईप २ मधुमेहग्रस्त रुग्णांना याचा फायदा होतो. यात काही लोकांचा अभ्यासात समावेश करून, त्यांना दोन गटात विभागण्यात आले. एका ग्रुपला नियमित २ ते ५ मिनिटं जेवल्यानंतर शतपावली करण्यास सांगितले. तर दुसऱ्या गटातील लोकं २० ते ३० मिनिटे चालायचे. मात्र, संशोधकांना असे आढळून आले की, जे फक्त २ मिनटे चालतात, त्यांची ब्लड शुगरची पातळी कमी झाली.

खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल

जेवल्यानंतर उभे राहिल्याने ब्लड शुगर कमी होते

संशोधकांच्या मते, जेवल्यानंतर आरामदायी स्थितीत बसण्याऐवजी आपण उभे राहू शकता. डिनरनंतर आपली हालचाल कमी होते, ज्यामुळे खाल्लेलं अन्न वेळेवर पचत नाही. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी बिघडते. जेवल्यानंतर काही वेळ उभे राहिल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. असे केल्याने रक्तातील साखर कमी होते किंवा सामान्य होते. जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर, जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडा वेळ उभे राहा, किंवा चाला.

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

शतपावली करण्याचे इतर फायदे

शतपावली फक्त मधुमेहावरच नाही तर हृदयाशी संबंधित समस्या, दमा, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, चालण्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत अनेक समस्या सुटतात. यासह चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Web Title: Just 2 Minutes of Walking After a Meal Is Surprisingly Good for your Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.