Join us   

रोज १ चमचा तीळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते ? पाहा नेमका उपाय काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 8:30 PM

how sesame seeds reduce cholesterol level : कोलेस्टेरॉल वाढले की अनेक उपाय केले जातात त्यापैकी कोणते उपाय असरदार?

रोजच्या आहारातला कोणताही पदार्थ हा आकाराने लहान असो की मोठा, तो आकाराने महत्त्वाचा नसतो तर त्यातील गुण महत्त्वाचे असतात. आकाराने अगदीच लहान असलेले तीळ आपल्याकडे अतिशय पौष्टिक म्हणून ओळखले जातात. हे तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये 'तीळ' या पदार्थाला अत्यंत महत्त्व आहे. तीळ हे त्वचेसारख्या नाजूक भागाचे संरक्षण करण्यापासून ते हदयासारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. एवढेच नव्हे तर हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यांच्या उपचारात तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. 

मानवी शरीरात कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पण बॅड कोलेस्टेरॉलमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक यासारखे आजार वाढतात. बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करायला हवा. त्यात १५ % सॅच्युरेटेड फॅट, ४१ % पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि ३९ % मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. यासंदर्भात,  आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी रोजच्या आहारात पांढरे तीळ खाऊन कोलेस्टेरॉलची पातळी कशी नियंत्रणात ठेवू शकतो याबद्दल माहिती दिली आहे( Just one tablespoon of sesame seeds daily could slash cholesterol levels).

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तीळ नेमके कसे उपयुक्त ठरतात... 

रोजच्या आहारात तिळाचा समावेश केल्याने वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करण्यात खूप मदत होते. कोलेस्टेरॉल  आणि ट्रायग्लिसराइड या दोघांमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. जेव्हा आपण रोजच्या आहारात तिळाचा समावेश करता तेव्हा ते कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. याचबरोबर तिळामध्ये, फायटोस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ते निरोगी कोलेस्टेरॉल (एचडीएल) पातळी सुधारण्याचे महत्वाचे कार्य करतात.

वॉटर बर्थ म्हणजे काय ? पाण्यात डिलिव्हरी करणं सुरक्षित असतं की धोक्याचं ?

तीळ हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. यासह चयापचय सुधारते. या बियांमध्ये मेथिओनाइन देखील असते, जे यकृत निरोगी ठेवण्यासोबतच बॅड कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात ठेवते. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉल खूप कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दोन महिने रोज ४० ग्रॅम तीळ खाल्ल्यास बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल. 

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

रोजच्या आहारात तिळाचा वापर कसा करावा... 

१. सॅलडमध्ये तीळ घालून खा :- रोजच्या आहारात तिळाचा समावेश करण्यासाठी आपण सॅलडवर थोडेसे तीळ भुरभुरवून घालू शकता. 

२. मसाल्यांसोबत वापरा :- आपण रोजचे जेवण बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यात चवीनुसार घालतो, या मसाल्यांसोबतच आपण काळे पांढरे तीळ घालू शकता. 

३. तिळाचे तेल :- स्वयंपाक करताना आपण इतर तेलांऐवजी तिळाचे तेल वापरू शकता. हाडांमधील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासोबतच या तेलामध्ये हाडे मजबूत करण्याचे गुणधर्म देखील आहेत.

४. तिळाची चटणी :- आपण रोजच्या जेवणात तोंडी लावायला म्हणून तिळाची चटणी देखील बनवून ठेवू शकता. 

५. तिळाची पोळी, लाडू :- आपण रोज बनवल्या जाणाऱ्या चपातीवर देखील तीळ भुरभुरवून घालू शकतो त्याचबरोबर तिळाचे लाडू बनवून देखील रोज एक खाऊ शकतो

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य