Join us   

कुकर की कढई, कोणत्या भांड्यात जेवण शिजवल्याने आरोग्याला जास्त फायदा होतो? शरीरासाठी काय फायद्याचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 4:58 PM

Kadhai or Cooker, Which is the best utensil for cooking food : जेवण करताना कोणत्या भांड्यात पदार्थ शिजवता हे देखील पाहणं महत्वाचं..

प्रत्येकाच्या घरात जेवण तयार होतेच, शिवाय पदार्थ करण्यासाठी विविध प्रकारच्या भांड्यांचाही वापर होतो. बहुतांश घरांमध्ये लोखंडी किंवा अॅल्युमिनियम धातूच्या भांड्यांचा वापर होतो. बरेच जण पदार्थ करताना कढई आणि प्रेशर कुकरचा वापर करतात. कारण कढई आणि प्रेशर कुकरमध्ये जेवण झटपट तयार होते. पण जेवण करण्यासाठी कढई चांगली की प्रेशर कुकर असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.

आपण कोणत्या भांड्यात पदार्थ शिजवतो, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण चुकीच्या भांड्यात पदार्थ शिजवल्याने त्याचा पोत आणि चव तर बिघडतेच, शिवाय आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते. त्यामुळे अन्न कढईत शिजवावे की प्रेशर कुकरमध्ये या प्रश्नाचे उत्तर फोर्टिस हॉस्पिटलचे पोषणतज्ज्ञ सिमरन सैनी यांनी दिलं आहे(Kadhai or Cooker, Which is the best utensil for cooking food).

प्रेशर कुकर की कढई कशात जेवण शिजवावे?

- प्रेशर कुकरमध्ये पदार्थ वाफेवर शिजते. शिवाय शिट्टीमुळे कुकरमधील पदार्थ शिजण्यास वेळ घेत नाही. कुकरमध्ये अन्न शिजायला कमी वेळ लागते, व अन्न अर्धवट कच्चे राहत नाही. 

- कुकरमध्ये अन्न लवकर शिजत असल्यामुळे त्यातील पोषण मूल्य कमी होते. ज्यामुळे अन्नातून मिळणारे घटक शरीराला योग्यरित्या मिळत नाही.

न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक

- तज्ज्ञांनुसार, कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाणं, आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे अनेकदा पोटाचे विकार जसे गॅसेस, अॅसिडिटी, पोट फुग्ण्याचा त्रास होऊ शकते.

- कढईमध्ये पदार्थ लवकर शिजत नाही. पदार्थ शिजण्यास खूप वेळ लागते. पण त्यातील पोषक घटक नष्ट होत नाही. यामुळे पदार्थ चवीला तर तयार होते. शिवाय त्यातील पोत आणि चव बिघडत नाही.

पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंह वेट लॉससाठी पिते बुलेटप्रूफ कॉफी, ब्लॅक कॉफीमध्ये मिसळते तूप, हा कॉफीचा कोणता प्रकार?

- तज्ज्ञांच्या मते, कुकरऐवजी कढईत शिजलेले अन्न अधिक आरोग्यदायी ठरते. यामुळे पोटाशी संबंधित त्रास होत नाही.

- बहुतांश घरांमध्ये अॅल्युमिनियम किंवा तांब्याच्या धातूच्या कढईचा वापर होतो. पण याव्यतिरिक्त आपण लोखंडी कढईचा वापर करू शकता. लोखंडी कढईत शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

- कढई आणि कुकरऐवजी आपण मातीच्या भांड्यात जेवण तयार करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न