Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शांत झोप येण्यासाठी करीना कपूर दुधात घालते १ गोष्ट, फिटनेसही वाढते

शांत झोप येण्यासाठी करीना कपूर दुधात घालते १ गोष्ट, फिटनेसही वाढते

Kareen Kapoor's Golden Milk Recipe For Boosting Immunity गरोदरपणानंतर करीना नियमित दुधात मिक्स करून प्यायची जायफळ पावडर, काय आहेत याचे अन्य फायदे पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2023 03:44 PM2023-07-09T15:44:40+5:302023-07-09T15:45:21+5:30

Kareen Kapoor's Golden Milk Recipe For Boosting Immunity गरोदरपणानंतर करीना नियमित दुधात मिक्स करून प्यायची जायफळ पावडर, काय आहेत याचे अन्य फायदे पाहा..

Kareen Kapoor's Golden Milk Recipe For Boosting Immunity | शांत झोप येण्यासाठी करीना कपूर दुधात घालते १ गोष्ट, फिटनेसही वाढते

शांत झोप येण्यासाठी करीना कपूर दुधात घालते १ गोष्ट, फिटनेसही वाढते

बॉलीवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर आपल्या हेल्थची नेहमी काळजी घेते. ती दोन मुलांची आई असून, ती स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देते. गरोदरपणानंतर वजन कमी करण्यापासून ते मेन्टेन ठेवण्यापर्यंत करीनाला फिट अभिनेत्रीचा दर्जाही देण्यात आला आहे. वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी खूप मदत केली. तिने दिलेल्या डाएटमुळे करीनाचे वजन कमी होण्यास मदत झाली.

याआधी फेसबुक लाइव्ह चॅट व्हिडिओमध्ये ऋजुताने सांगितले होते की, ''प्रेग्नेंसीनंतर करीना दर 2 तासांनी जेवण करायची. एवढेच नाही तर करीना झोपण्यापूर्वी एक कप दुधात थोडं जायफळ पावडर मिसळून प्यायची. यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळते, व शांत झोप देखील लागते''(Kareen Kapoor's Golden Milk Recipe For Boosting Immunity).

या पद्धतीने करा जायफळ दूध

एक कप दूध

अर्धा टेबलस्पून जायफळ पावडर

चिमुटभर दालचिनी

पाण्यात मीठ - साखर घालून पिण्याचे ५ भन्नाट फायदे, आजार होतील दूर, दिवसभर काम करण्याची ऊर्जाही मिळेल

मध

कृती

दूध गरम करून घ्या, दुधाला उकळी आल्यानंतर त्यात जायफळ पावडर, चिमुटभर दालचिनी पावडर आणि मध घालून मिक्स करा, त्यानंतर २ ते ३ मिनिटांसाठी हलवत राहा. तयार जायफळ दूध एका ग्लासमध्ये काढा. व दूध कोमट झाल्यानंतर प्या.

आयुर्वेदानुसार जायफळाचे महत्त्व

आयुर्वेदानुसार, पदार्थात जायफळ विशेषतः शरद ऋतूत आणि हिवाळ्याच्या महिन्यांत वापरला जातो, कारण हा एक उबदार मसाला आहे. जायफळात असे कंपाउंड आढळते, जे मज्जासंस्थेमध्ये संतुलन आणि शांतता आणण्यास मदत करते. हे कंपाउंड केवळ तणाव कमी करण्यास मदत करत नाहीत तर, पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

शांत झोप लागते

दुधात जायफळ पावडर मिक्स करून प्यायल्याने, शांत झोप लागते. यात आपण ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर देखील मिक्स करू शकता.

जायफळ मूड सुधारते

अनेक अभ्यासातून असे निदर्शनास आले की, जायफळ नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे तणाव दूर होतो आणि मन शांत होते.

बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही

सांधे आणि स्नायू वेदनेपासून आराम

जायफळ पावडरमध्ये उच्च अँटिऑक्सिडेंट सामग्री व्यतिरिक्त, मोनोटेरपीन्सने देखील आढळते. ज्यामुळे सूज कमी होते, यासह सांधेदुखी आणि स्नायू वेदनेपासून आराम मिळतो.

जायफळ किती खावे?

जायफळ एक शक्तिशाली सुगंधी मसाला आहे, जे कोणत्याही पदार्थाची चव दुपट्टीने वाढवू शकते. त्यात मायरीस्टिसिन नावाचे रसायन असल्याने, मळमळ आणि चक्कर येणे यासारखे आजार निर्माण होऊ शकते. त्यामुळे जायफळाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. पदार्थात नेहमी अर्धा चमचा जायफळ पावडरचा वापर करावा.

Web Title: Kareen Kapoor's Golden Milk Recipe For Boosting Immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.