Join us   

लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनानं शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ; पाहा तिचा अ‍ॅब्स वर्कआऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 2:45 PM

तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालासोबत तिचे ऍब्स टोन करण्यासाठी व्यायाम करताना दिसत आहे

गेल्या काही महिन्यांपासून कटरिना कैफ आपल्या लग्नामुळे चर्चेच होती. कॅटविकच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. आता तिनं सोशल मीडियावर अॅब्स वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. जर तुम्ही नवीन वर्षात जिममध्ये जाण्यासाठी काही प्रेरणा किंवा संकल्प शोधत असाल, कतरिना कैफचा वर्कआउट व्हिडिओ उत्तम उदाहरण म्हणून काम करेल. कतरिनाने तिच्या वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Katrina kaif does intense abs exercises)

या क्लिपमध्ये ती तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालासोबत तिचे ऍब्स टोन करण्यासाठी व्यायाम करताना दिसत आहे. कॅटरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर दोन लहान क्लिप शेअर केल्या आहेत. “वर्षातील शेवटचा कसरत,”  अशी तिनं व्हिडिओला कॅप्शन दिली. कतरिनानं या व्हिडीओमध्ये गुलाबी टॉप आणि ग्रे ट्रॅक पॅण्ट घातलेली दिसून येत आहे. 

 

काय आहे कतरीनाचा फिटनेस फंडा?

रेग्युलर वर्कआऊट 

आज कतरीना ३८ वर्षांची आहे. या वयातही तिनं स्वत:ला ज्या पद्धतीनं मेंटेन केलं आहे, ते खरोखरंच लाजवाब आहे. वय वाढतं तसं तिचं सौंदर्यही दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. याच सगळ्यात मुख्य कारण आहे तिचं रेग्यूलर वर्कआऊट. डेली वर्कआऊट झालंच पाहिजे. त्याबाबतीत नो एक्सक्यूज असं कतरीनाचं ठरलेलं आहे. जीममध्ये जाऊन घाम गाळल्याशिवाय कतरीनाचा दिवस काही पुर्ण होत नाही. 

या पदार्थांपासून राहते दूर 

चीज, पनीर, बटर, तूप, साय असे कोणतेही पदार्थ खाणं कतरीना टाळते. ती दूध देखील जास्त प्रमाणात घेत नाही. दुधाऐवजी सोया मिल्क, बदाम मिल्क, सोया पनीर, स्किम्ड मिल्क असे पदार्थ खाण्यास ती प्राधान्य देते. तिच्या वेटलॉसच्या थेअरीनुसार वरील पदार्थ खाल्ले तर खूप लवकर वजन वाढते. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहणेच तिला आवडते. यासोबतच ती मैद्यापासून बनलेले पदार्थ आणि पास्ता खाणेही टाळते. 

साखर खाणं टाळते

आरोग्यासाठी साखर कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे, हे तर आपण जाणतोच. असंच काहीसं कतरीनाचं मत आहे. ती म्हणते की सारखेमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. त्याचा आरोग्यावर खूपच विपरित परिणाम होतो. त्यामुळे साखर असणारा कोणताही पदार्थ कतरीना खात नाही. साखरेऐवजी ती गुळ किंवा मधाचा वापर करते.  

उकडलेल्या भाज्या

दिवसातून एक वेळा तरी कतरीना उकडलेल्या भाज्या खाण्यास प्राधान्य देते. एकवेळ जेवण अणि एक वेळ only boiled vegetables असं काहीसं कतरीनाचं फिटनेसचं गणित आहे. या भाज्यांमध्ये ती मीठ टाकणं टाळते. कोणती भाजी किती वेळ उकडायची, तसेच आठवड्यात कोणत्या दिवशी कोणती भाजी खायची, याचं तिचं गणितही ठरलेलं आहे. कारण भाज्या अतिजास्त उकडल्या जर त्यातलं पोषणमुल्य नष्ट होतं. कतरीनासारखं हे असं आपल्याला फॉलो करता आलं, तर आपल्यालाही मिळू शकते तिच्यासारखी नितळ त्वचा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकतरिना कैफफिटनेस टिप्स