उन्हाळ्यात शरीराचे खूप नुकसान होते. आरोग्यासह स्किन व केसांच्या निगडीत देखील समस्या निर्माण होतात. यासह उष्माघात, डिहायड्रेशन, अशा समस्या छळतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण अनेक प्रकारचे पेय पितो, यासह ज्यूस, एनर्जी ड्रिंक, कोल्डड्रिंकचं देखील सेवन करतो. या पेयामुळे काही वेळेसाठी शरीराला थंडावा मिळतो. पण त्यानंतर आहे तशी तहान लागते, व शरीर डिहायड्रेट होते. या पेयांऐवजी आपण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पेयांचे सेवन करू शकता. या पेयामुळे शरीरातील उष्णता कमी होईल व दीर्घकाळ थंडावा देखील जाणवेल.
शरीर थंड ठेवण्यासाठी आर्टिफिशियल पेयांऐवजी घरगुती नैसर्गिक पेय पिण्याचा सल्ला, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वारालक्ष्मी यानामन्द्रा देतात. त्यांच्या मते, खर्जुरादि मंथा हे पेय प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. उष्णतेवर मात करण्याचा हा सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय आहे(Kharjuradi mantha-a classical summer drink!!).
आयुर्वेदिक खर्जुरादि मंथा करण्यासाठी लागणारं साहित्य
100 ग्रॅम खजूर
100 ग्रॅम मनुका
100 ग्रॅम वाळलेल्या अंजीर
500 मिली थंड पाणी
उन्हाळ्यात पिवळंट रंगाची लघवी होते? हा आजार की गंभीर आजाराची लक्षणे..
1 टीस्पून कोकोनट शुगर किंवा गुळ
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात 100 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम वाळलेल्या अंजीर, 500 मिली थंड पाणी, व 1 टीस्पून कोकोनट शुगर किंवा गुळ घेऊन पेस्ट तयार करून घ्या. सर्व साहित्य एकत्र ब्लेंड झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घ्या. दुपारच्या वेळेस थंड करून हे पेय प्या.
या पेयातून मिळतील ४ फायदे
नैसर्गिक शीतलता आणि ताजेपणा मिळेल
शरीरातील टिश्यूला पोषण मिळेल
शरीराला आयर्न मिळेल
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हा घरगुती उपाय मनाला जातो.
मुलांचा मेंदू तल्लख व्हावा, हुशार व्हावी मुलं असं वाटतं? आहारात हवेच ५ पदार्थ
या आयुर्वेदिक कोल्ड्रिंकच्या फायद्यांसोबतच डॉ वारालक्ष्मी यांनी, कोणत्या लोकांनी या पेयाचे सेवन टाळावे याबाबतीत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ज्यांना सर्दी-खोकला, मधुमेह, सायनस कंजेशन, ऍलर्जी आणि ज्यांना ताप आहे, त्यांनी या पेयाचे सेवन करू नये.