किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहे. हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. अनेक महिला कामाच्या गडबडीत पाणी कमी पितात. तर कधी बराचवेळ लघवी थांबवून ठेवावी लागते यामुळे मुत्राशयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. (Early warning signs that indicate your kidneys are not working efficiently)
दुखापतीमुळे, उच्च रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब झाल्यास, शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही आणि विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. विषारी किडनीची ही काही चिन्हे आहेत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे.
भूक कमी लागणं
शरीरात विषारी पदार्थ आणि कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होते. भूक कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सकाळी लवकर मळमळ आणि उलट्या होणे. यामुळे माणसाला सतत पोट भरलेले वाटते आणि काहीही खावेसे वाटत नाही. हे मूत्रपिंड निकामी होण्याचे धोकादायक लक्षण आहे, ज्याकडे कोणाचेही लक्ष नसते.
सर्दी-खोकला, घशात खवखवही जाणवतेय? साधा आजार की ओमायक्रॉनचा संसर्ग; कसं ओळखाल?
पायांमध्ये सूज
मूत्रपिंड शरीरातील कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या काम करणे थांबवतात तेव्हा सोडियम शरीरात जमा होते. ज्यामुळे पोटऱ्या आणि घोट्याला सूज येते. या स्थितीला एडेमा म्हणतात. डोळे आणि चेहऱ्यावर सूज दिसून येत असली, तरी त्याची लक्षणे हात, पाय आणि घोट्यांवर सर्वाधिक परिणाम करतात.
त्वचेत कोरडेपणा
त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम नसते तेव्हा असे होते. मग हे विषारी पदार्थ रक्तात जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते, कोरडेपणा येतो आणि दुर्गंधी देखील येते.
थकवा
सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे ही मूत्रपिंडाच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे, व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो. हे मूत्रपिंडात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होते.
ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय
सतत लघवी येणं
एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून 6-10 वेळा लघवी करते. वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते. काही लोकांच्या लघवीतूनही रक्त बाहेर येते. खराब झालेल्या किडनीमुळे लघवीमध्ये रक्त पेशी गळती झाल्यानं असे होते.