Join us   

किडनी स्टोन असेल तर 'हे' ४ पदार्थ खाणे टाळावेत, धोका वेळीच टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 5:12 PM

Kidney Stone Diet Plan and Prevention : किडनी स्टोन असल्यास काय खावे - काय खाणं पिणं टाळावे?

मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन होणं ही एक सध्या कॉमन समस्या बनली आहे (kidney stone). किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जेव्हा आपली किडनी टाकाऊ पदार्थ नीट फिल्टर करू शकत नाही, तेव्हा या गोष्टी मुत्रपिंडात जमा होतात (health tips). ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतो.

खाण्या-पिण्यातील अनियमितता आणि पुरेसं पाणी न पिणे, यामुळे मुतखडा होऊ शकते. ज्यामुळे मूत्राशयातील मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांनी, त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी(Kidney Stone Diet Plan and Prevention).

आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात, 'किडनी स्टोनच्या रुग्णांनी निरोगी आणि संतुलित आहार पाळण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून स्टोनचा आकार वाढू नये. किडनी स्टोनच्या रुग्णांनी मिठाचे प्रमाण कमी आणि आंबट पदार्थही कमी प्रमाणात कमी खावे. शिवाय पाणी जास्त प्रमाणात प्यावे. कधी कधी लघवीद्वारे लहान मुतखडा बाहेर पडतो. त्यामुळे शरीरात पुरेसे पाणी असणं गरजेचं आहे.'

दाताला ब्रेसेस लावल्या? ४ गोष्टी खाणं टाळा; दात किडतील - दुखणं वाढेल

किडनी स्टोनच्या रुग्णांनी हे पदार्थ टाळावेत

- आहारतज्ज्ञांच्या मते, सोडियमयुक्त पदार्थ किडनी स्टोनची समस्या वाढवू शकतात. यासाठी जंक फूड खाणं टाळायला हवे. जंक फूड आणि खारट पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे जंक फूड खाणं टाळावं.

- प्रोटीन रिच पदार्थांमुळे किडनी  स्टोनची समस्या वाढू शकते. प्रोटीन युरिक ॲसिड वाढवतात, ज्यामुळे किडनी स्टोनची देखील समस्या वाढू शकते.

श्रीराम नेने सांगतात खा ६ पदार्थ; प्रोटीनचा खजिना- वाढतील मसल्स - मिळेल ताकद

- रोगप्रतिकारक शक्तीसाठी लिंबूवर्गीय फळे फायदेशीर मानली जातात, परंतु किडनी स्टोनच्या रुग्णांनी लिंबूवर्गीय फळे खाणं टाळावे. किंवा मर्यादित खावे. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. याच्या अतिरेकीमुळे ऑक्सलेटचे उत्पादन वाढते ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.

- किडनी स्टोनच्या रुग्णांनी पालक खाणं टाळावे. पालकमध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असतं जे आपल्या शरीरात कॅल्शिअम ऑक्सालेट तयार करतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा आकार मोठा होऊ लागतो.

- किडनी स्टोनच्या रुग्णांनी थंड पेय आणि एनर्जी ड्रिंक पिणं टाळावे. या पेयांमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा आकार वाढतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य