पुरेसे पाणी न प्यायल्याने किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा (Kidney Stone) त्रास होऊ लागतो. यावर उपाय म्हणून तज्ज्ञ पुरेसं पाणी, पाण्याव्यतिरिक्त इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते.
शिवाय पुरेसं पाणी न प्यायल्याने उन्हाळी लागते. ज्यामुळे लघवीला भयंकर आग होते (Hydrate). यासह किडनीस्टोनचा देखील धोका वाढतो. पण किडनी स्टोन झाल्यानंतर थंड पाणी प्यावे की गरम? पिण्याच्या पाण्याचे योग्य तापमान काय असावे? दिवसभरात किती पाणी प्यावे? (Drinking Water) असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल(Kidney Stone Prevention: How Much Water Should You Drink?).
२०१३ साली इराणी डॉक्टर, इतर शास्त्रज्ञांचा पबमेड सेन्ट्रलमध्ये प्रकाशीत झालेल्या संशोधनानुसार, 'डिहायड्रेशनवर पाणी पिणे हा एकच उपाय आहे. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात सामान्य पाणी पिणे गरजेचं आहे. शक्यतो थंड पाणी पिणे टाळावे. १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास असणारे पाणी नियमित प्यावे. आपण साधारण जे हंड्यात पाणी साठवून ठेवतो, ते पाणी प्यावे. मुख्य म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी नियमित कोमट पाणी प्यावे.'
उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी
यासह युरो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अनूप रामाणी सांगतात, 'किडनी स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून नियमित ६ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. किडनी स्टोनचा त्रास असल्यास तो पुन्हा होऊ नये म्हणून किमान ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय शरीर डिहायड्रेटही होत नाही.'
पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवर होणारे परिणाम
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, शरीरात विषारी आणि टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे किडनीलाही हानी पोहोचते. डिहायड्रेशनमुळे किडनी स्टोन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि किडनी निकामी होऊ शकते.
प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम
किडनी स्टोन होऊ नये म्हणून किती लिटर पाणी प्यावे?
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पण आपण आजारी किंवा वय, लिंग आणि वातावरण यासह इतर गोष्टी पाहूनच दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.