किडनी स्टोन (Kidney Stone) होणं ही एक सामान्य समस्या आहे. जी कधीही कोणालाही उद्भवू शकते. किडनी स्टोन तयार होतो तेव्हा शरीरातील काही घटक घट्ट होऊन आत जमा होतात आणि मुत्रावाटे बाहेर पडतात. खाण्यापिण्याच्या सवयी, जास्त वजन असणं, सतत औषधं घेणं ही किडनी स्टोन होण्याची कारणं आहेत. (Effective Yoga Asans To Treat Kidney Stones) कमी प्रमाणात लिक्विड घेतल्याने युरिन कॉन्संट्रेटेड होते आणि हळूहळू क्रिस्टल्स बनायला सुरूवात होते. ज्याला किडनी स्टोन असं म्हणतात. किडनी स्टोन तयार होऊ नये यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि युरिन डायल्यूट होते. (Ramdev Baba Shares a simple solutions to remove kidney stone)
किडनी स्टोन तुमच्या मुत्रमार्गावर परिणाम करते. ही एक गंभीर समस्या आहे. किडनी स्टोन काढून टाकणं खूपच त्रासदायक असू शकतं. हा दगड मोठ्या आकाराचा नसेल तर भरपूर पाणी पिऊन बाहेर काढला जाऊ शकतो. (Ramdev Baba Shares a Effective Ways To Kidney Stone) मुत्रमार्गात अडकल्यानंतर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर स्टोन मुत्रमार्गात अडकला असेल तर सर्जरी करण्याची वेळही येऊ शकते. किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील याबाबत योग गुरू बाबा रामदेव यांनी अधिक माहिती दिली आहे.
सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....
1) आंबट ताक
ताक प्यायल्याने डिहायड्रेशची समस्या उद्भवत नाही. ताकातील कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरेस यांसारखी तत्व किडनी स्टोनचा धोका कमी करतात.
2) कुळीथाची डाळ
कुळीथाची डाळ पॉलिफेनोल्स, फ्लेवोनोईड्स, स्टेरॉईड्स, प्रोटीन्स, आयर्न, व्हिटामीन बी कॉम्पलेक्स, कॅल्शियम इत्यादींनी परिपूर्ण असते. यामुळे किडनी स्टोनाचा धोका टाळता येतो.
3) मुळा
मुळ्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होते. किडनी स्टोन होऊ नये यासाठी अर्धा ग्लास मुळ्याचा रस प्यायला सुरूवात करा. मुळ्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होते.
ओटी पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? सकाळी रिकाम्या पोटी १ उपाय करा, पोट कमी होईल-स्लिम दिसाल
किडनी स्टोनची लक्षणं
कंबरेच्या खाली, पाठीच्या वेदना उद्भवतात. मुत्राचा रंग बदलणं, लघवी करताना जळजळ होणं, सामान्यपेक्षा जास्त मुत्र येणं अशी लक्षणं जाणवतात. तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.