Join us   

Kitchen Tips : मिक्सर ग्राइंडर लवकर खराब होऊ नये म्हणून 5 टिप्स वापरा; वर्षानुवर्ष टिकेल मिक्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 1:04 PM

Kitchen Tips : रोज मिक्सरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून तुमचा मिक्सर किंवा ग्राइंडर पुन्हा पुन्हा खराब होणार नाही.

स्वयंपाकघरात मिक्सर ग्राइंडर आणि ब्लेंडर जवळजवळ दररोज वापरले जातात. चटणी, वाटण, ज्यूस अशा रोजच्या आहारातल्या अनेक पदार्थांसाठी मिक्सरची गरज भासते. कधी, कधी दळताना मिक्सरचे ब्लेड्स खराब होतात तर मिक्सर बंद पडतात. विशेष म्हणजे आपण मिक्सर ग्राइंडरचा वापर निष्काळजीपणाने करतो. (kitchen Tips and Tricks)  त्यामुळे मिक्सर किंवा ब्लेंडर पुन्हा पुन्हा खराब होतात. अशा स्थितीत रोज मिक्सरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून तुमचा मिक्सर किंवा ग्राइंडर पुन्हा पुन्हा खराब होणार नाही. (5 Things to remember while using blender mixer grinder)

ओव्हर लोडींग करू नका

मिक्सर ग्राइंडर किंवा ब्लेंडरमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त साहित्य कधीही घालू नका. जर त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त साहित्य टाकले तर त्याचे झाकण उघडून बाहेर पडू शकते आणि त्यातील पदार्थ बाहेर पडू शकतात.

छातीत जळजळ, अ‍ॅसिडीटीमुळे झोपही येत नाही? ५ पदार्थ खा; आंबट ढेकर, अ‍ॅसिडीटीला कायमचं ठेवा लांब

सर्व साहित्य एकत्र करा

लोक एकाच वेळी ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य टाकतात, परंतु यामुळे ब्लेड योग्यरित्या फिरवणे गैरसोयीचे होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कोथिंबीरीची चटणी बनवत असाल, तर चटणीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकल्यास त्याचे ब्लेड अडकू लागते ज्यामुळे चटणी नीट दळता येत नाही. याशिवाय फळांचा रस बनवताना सर्व फळे मिसळणे टाळावे.

गरम साहित्य टाकू नका

मिक्सरमध्ये कधीही गरम साहित्य टाकू नका. असे केल्याने मिक्सरचे झाकण अचानक उघडते आणि साहित्य बाहेर पडू लागते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात.

चुकीच्या ब्लेड्सचा वापर करू नका

मिक्सर ग्राइंडर वापरताना तुम्ही चुकीचे ब्लेड वापरत नाही याची नेहमी खात्री करा. असे केल्याने मिक्सरचे तसेच तुम्ही वापरत असलेल्या सामग्रीचे नुकसान होऊ शकते.

१० मिनिटात झोपण्याची ट्रिक! रात्री पडल्या पडल्या झोप येण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुचवला भन्नाट उपाय

झाकण व्यवस्थित बंद आहे की नाही ते पाहा

मिक्सर ग्राइंडरचे झाकण लावताना ते व्यवस्थित बंद आहे की नाही ते नेहमी तपासा. तसे न केल्यास झाकण कधीही उघडू शकते, ज्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो.

टॅग्स : किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.