Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Kitchen Tips : बोरॅक्स पावडरनं घाणेरडं किचन ५ मिनिटात होईल स्वच्छ; टाईल्स, फरश्यांवर असा करा वापर

Kitchen Tips : बोरॅक्स पावडरनं घाणेरडं किचन ५ मिनिटात होईल स्वच्छ; टाईल्स, फरश्यांवर असा करा वापर

Kitchen Tips : बोरॅक्स पावडर कपड्यांवर किंवा फरशीवरील कोणतेही डाग सहज काढण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपायांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:52 PM2021-08-16T19:52:18+5:302021-08-16T20:06:51+5:30

Kitchen Tips : बोरॅक्स पावडर कपड्यांवर किंवा फरशीवरील कोणतेही डाग सहज काढण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपायांपैकी एक आहे.

Kitchen Tips : Different uses of borax powder article | Kitchen Tips : बोरॅक्स पावडरनं घाणेरडं किचन ५ मिनिटात होईल स्वच्छ; टाईल्स, फरश्यांवर असा करा वापर

Kitchen Tips : बोरॅक्स पावडरनं घाणेरडं किचन ५ मिनिटात होईल स्वच्छ; टाईल्स, फरश्यांवर असा करा वापर

स्वयंपाकघर कितीहीवेळा स्वच्छ केलं तरी  लगेच अस्वच्छ होतं. हट्टी डाग कितीही वेळा घासलं तरी निघत नाहीत. घराची साफसफाई करण्यापासून ते कपड्यांवरील डाग काढून टाकण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी डिर्टेंजंट, ब्लिचचा वापर केला जातो. व्हिनेगर, बेकिंग सोडा या पदार्थांचा वापर करून स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. स्वयंपाकघरातील खराब झालेल्या टाईल्स, फरशी स्वच्छ करण्यासाठी बोरेक्स पावडर फायदेशीर ठरतो. त्याच्या मदतीने कपड्यांवरील डाग दूर करण्यापासून पावसाळ्यात माश्यांना दूर ठेवण्याचं काम करता येऊ शकतो. 
 

डाग सहज निघून जातात

बोरॅक्स पावडर कपड्यांवर किंवा फरशीवरील कोणतेही डाग सहज काढण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपायांपैकी एक आहे. त्याच्या वापराने हळदीचे डाग, तेलाचे डाग, भाजीचे डाग इत्यादी सहज काढता येतात. त्याचा वापर डाग देखील काढून टाकतो आणि कपड्यांचा रंग निघत नाही. एक ते दोन चमचे बोरॅक्स पावडर एका कोमट पाण्यात मिसळा. मिक्स केल्यानंतर मिश्रण 5-10 मिनिटे सोडा. 10 मिनिटांनंतर, ब्रशने स्वच्छ करा. या उपायानं  स्वयंपाकघरातील फरशा काही वेळातच चमकायला लागतील. 

पावसाळ्यात किड्यांना लांब ठेवता येतं

इतर दिवसांच्या तुलनेत, बेड रूम, स्वयंपाकघर आणि बाथरूमपर्यंत पावसाळ्याच्या दिवसात किडे जास्त असल्याचे दिसून येतं. कधीकधी हे कीटक आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात. अशा परिस्थितीत, बोरॅक्स पावडर पावसात माशांना दूर नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी दोन मग चमचे बोरॅक्स पावडर आणि एक चमचा लिंबाचा रस दोन मग पाण्यात घालून मिश्रण तयार करा. आता हे लिक्विड एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि घराच्या सर्व भागात फवारणी करा. यामुळे किटक पळून जातील.

टाईल्स साफ करण्यासाठी फायदेशीर

बोरॅक्स पावडर किती उपयुक्त आहे हे तुम्हाला माहित असेलच. त्‍याचा वापर भांड्यातून येणारा घाण वास दूर करण्‍यासाठी केला जाऊ शकतो. हे इतर भांडीच्या द्रव्यांपेक्षा वेगाने वास काढून टाकते. याशिवाय, जर टाइल्सवर चहा, पाणी, भाज्या इत्यादींचा डाग असेल तर काही मिनिटांत ते काढण्यासाठी बोरॅक्स पावडर हा सर्वोत्तम घरगुती उपाय असू शकतो. यासाठी बोरॅक्स पावडर डाग लागलेल्या भागावर ठेवा आणि काही वेळ असंच राहू द्या. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की डाग निघून गेला आहे.
 

Web Title: Kitchen Tips : Different uses of borax powder article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.