Join us   

Kitchen Tips : घरातली दुर्गंधी, गंज घालवण्यासाठी वापरा कच्चे तांदूळ; स्वच्छ, चकचकीत घरासाठी ४ सोपे हॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 3:20 PM

Kitchen Tips : कच्चे तांदूळ तुम्ही रूम फ्रेशनरप्रमाणेही वापरू शकता. मूठभर तांदूळ तुमची खोली सुगंधित ठेवू शकते. कच्चे तांदूळ दुर्गंधी असलेल्या खोलीत रात्रभर ठेवा. सकाळपर्यंत दुर्गंध कमी झालेला असेल.

घरातली कामं कितीही आवरलं तरी संपता संपत नाहीत. जेवण, भांडी, कपडे आवरणं या रोजच्या कामांपासून फुरसत मिळत नाही. त्यामुळे कानाकोपऱ्यातील अस्वच्छता वाढत जाते. कधीतरी सणावाराच्यावेळी साफ सफाई केल्यानंतर पुन्हा घरात घाण, धूळ साचायला सुरूऱ्यावात होते. (Easy Kitchen Tips)

कमी वेळात झटपट कामं आवरण्यासाठी नवीन ट्रिक्स शिकत राहणे फायदेशीर ठरू शकतं. आज तुम्हाला तांदळाशी संबंधित अशाच काही हॅक्सबद्दल सांगत आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. हे दैनंदिन कामाशी संबंधित हॅक आहेत जे तुम्ही तुमच्या घरात वेळोवेळी वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या तांदळाचा वापर कोणत्या कामांसाठी केला जाऊ शकतो. (Cleaning Tips and tricks)

.

गंज काढून टाकण्यासाठी तांदळाचा वापर

कच्च्या तांदळाचा वापर चांदीवरील डाग दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही एक अतिशय उपयुक्त ट्रिक आहे, जर तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा चांदीची स्वयंपाकघरातील भांडी असतील तर ती तांदळाबरोबर ठेवा. ऑक्सिडाइज्ड दागिने आणि काही लहान लोखंडी वस्तूंही तुम्ही अशाच प्रकारे वापरू शकता.  तुम्हाला फक्त चांदीची भांडी किंवा दागिने उघड्या डब्यात किंवा कच्च्या तांदळाच्या पिशवीत ठेवावे लागतील.  जर तुमच्या घरात आर्द्रता जास्त असेल तर वेळोवेळी तांदूळ बदलत राहा. 

दुर्गंधी घालवण्यासाठी

कच्चे तांदूळ तुम्ही रूम फ्रेशनरप्रमाणेही वापरू शकता. मूठभर तांदूळ तुमची खोली सुगंधित ठेवू शकते. कच्चे तांदूळ दुर्गंधी असलेल्या खोलीत रात्रभर ठेवा. सकाळपर्यंत रूम दुर्गंध कमी झालेला असेल. कच्च्या तांदळाच्या पिशवीत तुम्ही इसेंशियल ऑईल्सही घालू शकता. 

तेलाचं तापमान तपासण्यासाठी

जर तुम्हाला काही तळायचे असेल तर सर्वप्रथम तेल चांगले गरम करावे लागते. तेलाचे तापमान योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काही खाद्यपदार्थच टाकतो, परंतु यासाठी कच्चा तांदूळ हा एक चांगला उपाय ठरू शकतो. तेलाची चव न बदलता त्याचं तापमान पाहता येऊ शकतं. 

साखरेला मॉईश्चर लागण्यापासून बचाव

तांदूळ ओलावा चांगल्या प्रकारे शोषून घेतो, म्हणून बहुतेक लोक ते मीठ आणि इलेक्ट्रिकल वस्तूंसाठी वापरतात,  साखरेतून आद्रता काढून टाकण्यासाठी साखर तितकीच उपयुक्त ठरू शकते. कापसाच्या पिशवीत तांदूळ भरून साखरेच्या पेटीत ठेवावा लागतो. हे ब्राउन शुगर आणि व्हाईट शुगर दोन्हीसाठी वापरले जाऊ शकते.

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स