Join us   

Kitchen Tips : किचनमधली काम संपता संपत नाहीत, रात्री खूप थकवा जाणवतो? ७ ट्रिक्स वापरा नेहमी टवटवीत, फ्रेश राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:45 PM

kitchen tips in Marathi : हे हॅक्स तुम्हाला तुमचे स्वयंपाकघरातील काम जलद आणि उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात मदत करतील. (Easy kitchen hacks and tricks)

घरातल्या प्रत्येक महिलेला जेवण बनवण्यासाठी , साफ सफाईसाठी, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी राब राब राबावं लागतं. कामाच्या नादात स्वयंपाकघरात किती वेळ जातोय. याची कल्पनाही नसते. (Kitchen Tips) स्वयंपाकघरातील कामं न संपणारी असली तरी काही टिप्स वापरून तुम्ही ते सोपे करू शकत नाही. हे हॅक्स तुम्हाला तुमची स्वयंपाकघरातील कामं लवकर आणि उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात मदत करतील. (Easy kitchen hacks and tricks)

1) जर तुम्ही कामाला जात असाल आणि सकाळी स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटत असेल, तर भाज्यांचे वाटण,  मसाला किंवा आलं, लसूण,मिरची कांद्याची पेस्ट बनवा आधीच बनवून  ठेवा. जी दोन आठवडे टिकेल. जेणेकरून पटपट रोजच्या भाज्यांमध्ये या पेस्ट वापरता येतील.

फक्त २ मिनिटात चकचकीत, स्वच्छ होतील खराब झालेले गॅस बर्नर, बटन्स; 'या' घ्या सोप्या ट्रिक्स 

2) अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मोकळे होतात. अशावेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या. ती किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका. त्याऐवजी त्यात मीठ घालून १५ मिनिटे ठेवा. यानंतर भाज्यांमध्ये पाणी येईल आणि जे पाणी असेल ते गाळून घ्या आणि त्यानंतर कोफ्ते बनवा. 

3) दही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ फाटतो किंवा व्यवस्थित बनत नाही. कढी उकळल्यावर मीठ घातलं तरी करी फाटलेली दिसते. अशावेळी तुम्हाला कढीचा गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकायचे आहे. दह्याची कढी चांगली शिजवून घ्या आणि बेसन शिजल्यावरच मीठ घाला. गॅस बंद केल्यानंतर दोन-तीन मिनिटानंतरही तापमान चांगले असले तर मीठ लगेचच विरघळते.

केस खूप गळतात? टक्कल पडण्याची भीती सतावतेय? दाट, काळ्याभोर केसांसाठी डॉक्टरांनी सुचवले 7 उपाय

4) चपाती शिजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात. अनेकांना अशा चपत्या खायला आवडत नाही. अशा स्थितीत पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्या. असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील. अगदी सामान्य रोटी बनवल्याप्रमाणे बनवली जाईल.

5) पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिकटून राहतो आणि फुलत नाही. अशा स्थितीत बनवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि नंतर पाणी घाला. तुमच्याकडे जे काही तांदूळ आहेत त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी घाला आणि नंतर त्यात 1 चमचे लिंबाचा रस घाला. याने तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच फुलून जाईल.

6)  कुकरमधील तांदूळ जळाला असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की शिजवलेल्या भाताला जळण्याची वास येईल, तर भात एका प्लेटमध्ये ठेवून नंतर पंखाखाली ठेवा. असे केल्याने भाताचा जळलेला वास फक्त २-३ मिनिटात निघून जाईल. भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच राहतो.

7) जर तुम्ही दही बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तर सर्वप्रथम विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे दुधाचे तापमान. दूध इतके गरम असले पाहिजे की जेव्हा तुम्ही बोट लावाल तेव्हा ते कोमट वाटेल. मग  त्यात १ चमचा दही घाला. यानंतर तवा गरम करून ही दही हंडी गरम तव्यावर ठेवा. यामुळे दही खूप घट्ट होईल आणि चांगले गोठेल.

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नपाककृती