Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Kitchen Tips : साफसफाई करताना डिशवॉशनं कधीही धुवू नका 'या' ७ गोष्टी; कधी खराब होतील कळणारही नाही

Kitchen Tips : साफसफाई करताना डिशवॉशनं कधीही धुवू नका 'या' ७ गोष्टी; कधी खराब होतील कळणारही नाही

Kitchen Tips : वेळीच लक्ष दिल्यास आपण घरातील इतर वस्तूंना खराब होण्यापासून वाचवू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:18 PM2021-09-07T14:18:38+5:302021-09-07T14:33:49+5:30

Kitchen Tips : वेळीच लक्ष दिल्यास आपण घरातील इतर वस्तूंना खराब होण्यापासून वाचवू शकतो. 

Kitchen Tips : Never wash these things with dish soap | Kitchen Tips : साफसफाई करताना डिशवॉशनं कधीही धुवू नका 'या' ७ गोष्टी; कधी खराब होतील कळणारही नाही

Kitchen Tips : साफसफाई करताना डिशवॉशनं कधीही धुवू नका 'या' ७ गोष्टी; कधी खराब होतील कळणारही नाही

अनेक घरांमध्ये कोणत्याही वस्तू खराब झाल्या असतील तर भांडी घासण्याच्या साबणाचा किंवा डिशवॉशचा वापर केला जातो. पण डिशवॉशच्या वापरानं अनेकदा चांगल्या वस्तू खराब होऊ शकतात. डिशवॉश किंवा साबणाचा वापर भांडी घासण्याशिवाय इतर कशासाठीही करणं टाळायला हवं. वेळीच लक्ष दिल्यास आपण घरातील इतर वस्तूंना खराब होण्यापासून वाचवू शकतो. 

१) कॉफी पॉट

तुम्हाला वाटत असेल की कॉफी पॉट साफ करण्यासाठी डिश वॉश हा चांगला उपाय आहे. पण असं केल्यानं तुमच्या कॉफीची चव बदलू शकते. डिश वॉश नेहमी रेसिड्यू सोडते यामुळे कॉफीच्या चवीवर परिणाम होतो. म्हणून कॉफी पॉट धुण्यासाठी या पद्धतीचा वापर करू नका. आधी सामान्य स्क्रबरने घासून घ्या आणि पाण्यात इसेंशियल ऑईलचे काही थेंब घालून स्वच्छ करा.  त्यामुळे कॉफीची चव सुधारेल तसेच कॉफी पॉटला गंजण्यापासून रोखता येईल.

२) वॉशिंग मशिन

डिश वॉशने वॉशिंग मशीन स्वच्छ करणं  योग्य नाही. डिश वॉश नेहमी बबल्स तयार करते आणि कपडे धुण्याच्या डिटर्जंटपेक्षा वेगळे असते आणि तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये वापरल्यास त्याचा परिणाम बबल बाथमध्ये होईल. तिथे इतके फोम असतील की आपण ते साफ करू शकणार नाही. 

कसे स्वच्छ करायचे- वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग लिव्किीड वापरू शकता. याशिवाय बेकिंग सोडा आणि व्हाईट व्हिनेगर किंवा लिंबूपाणी वापरू शकता.

३) कार धुण्यासाठी

कार वॉशसाठी डिश वॉश अजिबात वापरू नका. यामुळे बबल्स येतात. डिश वॉश, साबण कारचा रंग खराब करू शकतो. जर तुम्ही कारवर प्रोटेक्टिंग वॅक्स कोटिंग लावलं असेल तर डिशवॉशमुळे तेसुद्धा निघून जाऊ शकते. जर चुकून तुमची कार नीट धुतली गेली नाही आणि डिश वॉश त्यावर तसाच राहिला तर गाडी सुकल्यानंतर डाग तसेच राहू शकतात.  

कसे स्वच्छ करायचे- यासाठी, आपण लाँड्री डिर्टेंजंट देखील वापरू शकता, अन्यथा प्रोफेशनल कार वॉश घ्या, कारच्या बाह्य कोटिंगचे संरक्षण करणे नेहमीच चांगले ठरते.

४) केस आणि चेहरा

कितीही इमरजेंसी असेल तरी आपले केस आणि चेहरा डिश वॉशनं धुवू नका. आपली त्वचा आणि केसांवर नैसर्गिक तेल असते. डिश वॉशमधील खराब केमिकल्ससमुळे त्वचेवरून हे तेल नाहीसे होऊ शकते. डिश वॉशमध्ये sodium lauryl sulfate असते त्यामुळे डर्मेटायटिसचा धोका उद्भवू शकतो. नेहमी आपले स्किन केअर उत्पादनं आणि हेअर केअर उत्पादनांनीच त्वचा आणि केस स्वच्छ करा.

५) खिडक्यांच्या काजा, दरवाजे

डिश वॉश नेहमीच त्याचे डाग सोडतो. यामुळेच जर तुम्ही खिडक्या आणि दरवाजे डिशवॉशनं स्वच्छ केले तर साबणाचे डाग तसेच राहतील. हे काच आणि लाकूड दोन्हीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

कसे स्वच्छ करायचे- कोलीन किंवा तत्सम स्वच्छता एजंट कापडावर टाकून खिडक्या आणि दारं स्वच्छ करा.

६) लोखंडाची भांडी

आता तुम्ही असा विचार करत असाल की जर तुम्ही डिश वॉशनं लोखंडी भांडी नाही धुवायची तर कशानं धुवायची?पण डिश वॉश हे लोखंडी भांडी गंजण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

कसे स्वच्छ करायचे- गरम भांड्यात थोडे मीठ आणि पाणी घालून स्वच्छ करा. यामुळे गंज निघून जाण्यास मदत होईल. गंज लागण्यापासून बचावासाठी तुम्ही तेलही घालू  शकता. 

७) लेदर

डिश वॉशचा एक थेंब देखील आपल्या लेदरच्या सामनाचे नुकसान करू शकतो. बूट, कपडे, बॅग्स इत्यादी डिश वॉशपासून दूर ठेवणे चांगले ठरेल.

कसे स्वच्छ करायचे- लेदर स्वच्छ करण्यासाठी एक मॉइस्चरायझिंग लिक्विड निवडा. त्यामुळे लेदरच्या वस्तू जास्तवेळ टिकण्यासाठी  फायदा होईल. 

Web Title: Kitchen Tips : Never wash these things with dish soap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.