हल्ली बऱ्याच तरुण मुलांची हाडं ठणकतात, बसता- उठता गुडघे कुरकुरतात. जॉईंट पेनचा (joint pain) त्रास होतो. हे सगळं उतारवयात होत असेल, तर एकवेळ समजून घेण्यासारखं आहे. पण तरुणवयात हाडांचे असे दुखणे असेल तर मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी लगेचच घ्यायला पाहिजे (Knee pain and back pain at a young age?). आपल्या रुटीनमध्ये आपण अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे एकतर शरीराला कॅल्शियम मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे कॅल्शियम मिळालं तरी ते शरीरात व्यवस्थित शोषून घेतलं जात नाही (calcium rich food). या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या तर हाडांचं दुखणं कमी होण्यास आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी वाचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला.
हाडांची झीज करणाऱ्या ३ गोष्टी
हाडांची झीज करण्यासाठी किंवा हाडांना ठिसूळ करण्यासाठी काेणत्या गोष्टी जबाबदार आहेत, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclinic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
१. सॉफ्ट ड्रिंक
सॉफ्टड्रिंक किंवा कोल्ड्रिंकमध्ये फॉस्फरीक ॲसिड नावाचा घटक असतो. तो हाडांमधील कॅल्शियम कमी करताे. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात. हाडं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं.
५ पदार्थ- केस गळणं थांबून होतील दाट- लांब
२. कॉफी
जास्त प्रमाणात कॉफी पिणं हाडांसाठी घातक आहे. कारण त्यात असणाऱ्या कॅफेनमुळे कॅल्शियम हाडांमध्ये व्यवस्थित शोषून घेतलं जात नाही. त्यामुळे हाडं कुमकुवत होतात आणि मग शरीरातले वेगववेगळे जॉईंट्स, हाडं कमी वयातच दुखायला सुरुवात होते.
३. व्हिटॅमिन डी आणि K2 ची कमतरता
या दोन व्हिटॅमिन्सची शरीरात कमतरता असेल तरीही हाडांमध्ये कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेतलं जात नाही. परिणाम हाडं कमकुवत होऊन ऑस्टोपोरॅसिसचा धोका वाढतो. त्यामुळे हे दोन व्हिटॅमिन्स देणारे पदार्थ आहारात वाढवावेत.
गालिच्यावर खरकटं सांडल्याने खराब झाला? १ सोपा उपाय करा- न धुताही गालिचा होईल स्वच्छ
त्यासाठी शेवगा, तीळ, नाचणी, दही, चिया सीड्स, हिरव्या पालेभाज्या, कोबी या पदार्थांचं आहारातलं प्रमाण वाढवावं. २० मिनिटे तरी कोवळ्या सुर्यप्रकाशात बसावं आणि कॉफी, कोल्ड्रिंक घेणं कमी करावं किंवा बंद करावं.