वाढत्या वयात अनेकांना गुडघे दुखण्याचा त्रास उद्भवतो. (Knee Pain Health Tips) शरीरात पोषणाची कमतरता, चुकीच्या पदार्थांचे सेवन यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात. (Health Tips) गुडघ्यांमध्ये जाणवणाऱ्या वेदनांमुळे चालणं, फिरणंही कठीण होतं. या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि गुडघेदुखी टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करायला हवेत. आल्याचा चहा करण्याची सोपी पद्धत माहित असायला हवी. (Knee Pain Home Remedies Ginger Tea For Knee Pain And Joints Pain)
अमेरिकन कॉलेज ऑफ रूमॅटोलॉजी एण्ड आर्थरायटीस फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार स्विमिंग,सायकलिंग, योगा यांसारख्या फिजिकल एक्टिव्हीज करून तुम्ही गुडघ्यांच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता. हेल्दी वेट लॉससाठी व्यवस्थित डाएट करा, व्यवस्थित मेडीकेशन सुरू ठेवा, अक्युपंक्चर, मसाज यामुळे गुडघ्यांच्या वेदना टाळता येतात.
मोगऱ्याला फुलंच नाही, रोप सुकलंय? मातीत हा पदार्थ घाला, भरगच्च मोगरे येतील-सुगंधाने बहरेल घर
गुडघ्याच्या वेदना टाळण्यासाठी आल्याचे सेवन
आल्यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासावर आराम मिळतो. गुडघ्यातील वेदनांमधून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन करू शकता. आलं कुटून एक ग्लास पाण्यात घाला. त्यानंतर व्यवस्थित शिजवून घ्या नंतर हे पाणी एक कप बाजूला काढून त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध मिसळून घ्या.
दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही
रोज या चहाचे सेवन केल्यास गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो. गुडघ्याच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या मोहोरीच्या तेलात घालून व्यवस्थित शिजवून घ्या. हे तेल थंड करून या तेलाने गुडघ्यांची मालिश करा ज्यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.
हळद पाण्यात मिसळून हळदीच्या दूधाचे सेवन केल्याने गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो. हळदीचा लेप बनवून तुम्ही गुडघ्यांना लावू शकता. ज्यामुळे वेदना कमी होतात. वाढतं वजन गुडघ्यांवर दबाव टाकते. अशा स्थितीत वजन नियंत्रणात ठेवायला हवं.
केस पातळ होत आहेत? जावेद हबीब सांगतात, किचनमधला 'हा' पदार्थ लावा, १५ दिवसांत दाट होतील केस
थंड किंवा गरम वाफेने शेकल्यास सांध्यांच्या वेदना दूर होतात. गरम केल्यानंतर तव्यावर कापड ठेवून या कापडाने गुडघा शेका. त्यावर अर्धवट शिजलेली चपाती गुडघ्यांना काहीवेळ बांधून ठेवू शकता किंवा बर्फ कापडाला बांधून शेका. खाण्यापिण्यात पोषण असणं महत्वाचे आहे. आपल्या आहारात फळं, भाज्या, ओमेगा-३ फॅटी एसिड्टसयुक्त आळशीच्या बीया आणि चिया सिड्सचा समावेश करा.