Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्ही केलीये कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ? ४ फायदे, काय आहे थंडगार आईस बाथचा ट्रेंड...

तुम्ही केलीये कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ? ४ फायदे, काय आहे थंडगार आईस बाथचा ट्रेंड...

Know Benefits of Ice Bath for Health new Trend : फिट राहण्यासाठी बहुतांश अभिनेत्रीही आईस बाथ घेतात आणि त्याबाबत जाहीरपणे बोलतातही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 11:55 AM2023-09-29T11:55:46+5:302023-09-29T11:56:43+5:30

Know Benefits of Ice Bath for Health new Trend : फिट राहण्यासाठी बहुतांश अभिनेत्रीही आईस बाथ घेतात आणि त्याबाबत जाहीरपणे बोलतातही.

Know Benefits of Ice Bath for Health new Trend : Have you ever taken an ice bath? 4 benefits, what is the trend of cold ice bath... | तुम्ही केलीये कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ? ४ फायदे, काय आहे थंडगार आईस बाथचा ट्रेंड...

तुम्ही केलीये कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ? ४ फायदे, काय आहे थंडगार आईस बाथचा ट्रेंड...

आंघोळ करणे म्हणजे गरम पाण्याने अंग शेकणे आणि साफ करणे. फारतर काही जण कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने आंघोळ करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आणि सतत घाम येणाऱ्या ठिकाणी असे गार पाणी अंगावर घेणे ठिक आहे. पण एरवी आपल्याला कोणी गार पाण्याने आंघोळ कर म्हटले की आपल्या अंगावर ऐकूनच काटा येतो. गार पाण्याने हात पाय धुणे ठिक आहे पण अंगावर गार पाणी घेणे म्हणजे काही जणांना शिक्षाच वाटू शकते. याचा कळस म्हणजे बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा ट्रेंड सध्या बराच गाजतो आहे. आता बर्फाचे पाणी म्हणजे ते किती प्रमाणात गार असेल याची कल्पनाच न केलेली बरी. बर्फाचा तुकडा नुसता हातात धरला तरी आपला हात काही वेळासाठी बधीर होतो तर अशा पाण्याने आंघोळ का करायची असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर अशा पाण्याने आंघोळ करण्याचे आरोग्याला बरेच फायदे असतात. फिट राहण्यासाठी बहुतांश अभिनेत्रीही आईस बाथ घेतात आणि त्याबाबत जाहीरपणे बोलतातही. पाहूयात या आईस बाथचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात (Know Benefits of Ice Bath for Health new Trend)...

१. अंगदुखीपासून आराम मिळण्यास मदत 

बरेचदा महिलांना काही ना काही कारणाने अंगदुखीचा त्रास होत असतो. शरीर खूप दुखत असेल , मसल पेन किंवा सांधेदुखी आणि नसांमध्ये त्रास होत असेल तर बर्फाची आंघोळ यावर रामबाण इलाज मानला जातो. खेळाडू असलेल्यांना याचा अधिक फायदा होतो. हाडं आखडली असतील किंवा शरीर दुखत असेल तर बर्फाची आंघोळ केल्याने नक्की आराम मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत 

सतत आजारी पडू नये आणि विविध प्रकारचे संसर्ग होऊ नयेत म्हणून आपली प्रतिकारशक्ती चागली असणे आवश्यक असते. त्यासाठी उत्तम आहार, झोप, व्यायाम यांबरोबरच इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आईस बाथने कमकुवत पचनशक्ती मजबूत होते आणि शरीराची प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.

३. निद्रानाशावर उत्तम उपाय

हल्ली बहुतांश जणांना विविध कारणांनी रात्री झोप येत नाही. झोप झाली नाही की अॅसिडीटी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात आणि एकूणच आरोग्य खराब होते.  अशावेळी बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते. आईस बाथ घेतल्याने शरीराला आराम मिळतो आणि नर्व्हस सिस्टिम अधिक चांगली कार्य करते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. सुंदर नितळ त्वचेसाठी फायदेशीर 

आपली त्वचा अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि सुंदर असावी असे प्रत्येक स्त्रीला वाटते. बर्फाने आंघोळ करणे हा यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. त्वचेतील रक्तवाहिन्या थंड होण्याने संकुचित होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होते आणि त्वचेला चमक येते. आपल्या स्कीन केअर रुटीनमध्ये या गोष्टीचा समावेश केल्यास ग्लोईंग त्वचा मिळू शकते. 

Web Title: Know Benefits of Ice Bath for Health new Trend : Have you ever taken an ice bath? 4 benefits, what is the trend of cold ice bath...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.