Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाक करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धतीमुळे पोटात अन्नाचे होते विष; जागतिक आरोग्य संघटना सांगते...

स्वयंपाक करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धतीमुळे पोटात अन्नाचे होते विष; जागतिक आरोग्य संघटना सांगते...

Know How Cooking on Wood and Charcoal Can Damage your health : जुनं ते सोनं म्हणत तुम्हीही चुलीवर स्वयंपाक करताय? आरोग्यासाठी घातक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 09:40 AM2023-09-05T09:40:25+5:302023-09-05T09:45:02+5:30

Know How Cooking on Wood and Charcoal Can Damage your health : जुनं ते सोनं म्हणत तुम्हीही चुलीवर स्वयंपाक करताय? आरोग्यासाठी घातक...

Know How Cooking on Wood and Charcoal Can Damage your health : 'These' wrong method of cooking lead to food poisoning in the stomach; The World Health Organization says... | स्वयंपाक करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धतीमुळे पोटात अन्नाचे होते विष; जागतिक आरोग्य संघटना सांगते...

स्वयंपाक करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धतीमुळे पोटात अन्नाचे होते विष; जागतिक आरोग्य संघटना सांगते...

आपण रोजचा स्वयंपाक गॅसवर करतो. पण अनेकदा आपल्याला वेगळं काहीतरी खायची इच्छा होते. अशावेळी आपण ग्रामीण भागात चुलीवरचे जेवण करायला जातो. काही वेळा आपण आवर्जून चुलीवरची मिसळ किंवा चुलीवरचे नॉनव्हेजचे पदार्थ खायला जातो. अनेकदा आपण मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन तंदुरी रोटी, तंदुरी कबाब खातो. कोळशावर भाजलेल्या या पदार्थांना नैसर्गिक अशी एक वेगळी चव येते खरी. रात्रीच्या पार्टीमध्ये बार्बेक्यूसारख्या पदार्थांनाही सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असते. हे पदार्थ चवीला चांगले लागतात खरे पण ते आरोग्यासाठी खरंच चांगले असतात का याचा आपण फारसा विचार करत नाही. जुनं ते सोनं म्हणत आपण चुलीवरचे हे पदार्थ आवडीने खातो. मात्र आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होऊन आपल्याला त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात (Know How Cooking on Wood and Charcoal Can Damage your health)...

(Image : Google)
(Image : Google)

चुलीवरचा स्वयंपाक कितीही चांगला लागत असला तरी तो तयार करणे आरोग्यासाठी चांगला नसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारे इंधनाचा वापर करुन स्वयंपाक केला तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे ३० लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ३२ टक्के मृत्यू हे हृदयरोगाने, २३ टक्के स्ट्रोकने, २१ टक्के श्वसनाशी निगडीत आजारांमुळे, १९ टक्के त्रास हे फुफ्फुसांच्या आजारांनी आणि ६ टक्के मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात. महिला आणि मुलांसाठी अशाप्रकारची चूल वापरणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. या चुलीतून निघणारा धूर महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

कोळसा आणि लाकडाचा स्वयंपाकासाठी वापर केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आजही जगभरात १० पैकी ३ लोक चूलीचा वापर करतात. स्वयंपाकाच्या गॅसचा विचार केला तर बायोगॅस, एलपीजी, इलेक्ट्रीक, इथेनॉल, नॅचरल गॅस, आणि सोलर पॉवर यांचा समावेश होतो. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी या साधनांचा वापर करायला हवा. म्हणजे मृत्यूची संख्या कमी होईल आणि चुलीच्या धुरापासून होणाऱ्या त्रासापासूनही तुम्ही नक्कीच दूर राहू शकाल. 

Web Title: Know How Cooking on Wood and Charcoal Can Damage your health : 'These' wrong method of cooking lead to food poisoning in the stomach; The World Health Organization says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.