Join us   

आवडतं म्हणून मुलांसह पिझ्झा-बर्गरवर ताव मारता? जागतिक आरोग्य संघटना सांगते, जंकफूड ठरतंय जीवघेणं…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 4:25 PM

Know How Junk Food Is Dangerous for Health : कोरोनामध्ये जितके मृत्यू झाले नाहीत त्याच्या कित्येक पट वेगाने जंक फूड नियमितपणे खाल्ल्याने झाले आहेत.

घरचं खायचा कंटाळा आला की कर काहीतरी ऑर्डर किंवा मग कोणाला तरी भेटण्याच्या निमित्ताने बाहेरचं खाण्याला पसंती दिली जाते. बाहेर खायचं म्हटलं की एकतर ते खूप मसालेदार असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मैदा, साखर किंवा पदार्थ टिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. जीभेला हे पदार्थ चविष्ट लागत असले तरी आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसतात. जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर, वडे, तळलेले इतर पदार्थ यांसारख्या पदार्थांमुळे शरीरावरील फॅटस वाढत जातात. कोरोना महामारीपेक्षा हे जंकफूडचे संकट मोठे आहे असे दिसते. कारण कोरोनामध्ये जितके मृत्यू झाले नाहीत त्याच्या कित्येक पट वेगाने जंक फूड नियमितपणे खाल्ल्याने झाले आहेत (Know How Junk Food Is Dangerous for Health). 

(Image : Google)

जंक फूड का धोकादायक? 

जंक फूडमध्ये साखर, मीठ आणि फॅटस जास्त प्रमाणात असते. हे पदार्थ हाय कॅलरी असल्याने हे पदार्थ एकदा खाल्ले की खाल्ल्यासारखे वाटत नाहीत आणि वारंवार खावेसे वाटतात.     जंक फूड खाल्ल्याने दरवर्षी ८ टक्के लोक आजारी पडतात. नियमितपणे जंक फूड खाल्ले तर हाय ब्लड प्रेशर, दातांच्या समस्या, हृदयरोग, बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या यांसारखे त्रास होतात. जंकफूड खाल्ल्याने कोरोनापेक्षा तिप्पट वेगाने लोकांचे जीव दगावत आहेत. जंकफूडमुळे वर्षभरात ५ लाख ४० हजार जणांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी नुकतीच ही माहिती दिली. फास्ट फूडमध्ये असणारं ट्रान्स फॅटी अॅसिड या मृत्यूंना कारणीभूत ठरतंय. 

(Image : Google)

जंक फूडमुळे होणाऱ्या हार्ट डिसिजच्या रुग्णांची संख्या २८ टक्के असते, तर मृत्यू होण्याची शक्यता ३४ टक्क्यांनी वाढते असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. जगभरात ट्रान्स फॅटमुळे हृदयरोग झालेल्या लोकांची संख्या ५ अब्ज इतकी आहे. त्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे आपल्या जीवावर बेतणारे ठरु शकते हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. अशाप्रकारच्या जंक फूडमुळे लठ्ठपणाची समस्याही गेल्या काही वर्षात सर्वच वयोगटात वाढली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य आणि एकूणच जंक फूड आरोग्यासाठी चांगले नसते हे लक्षात ठेवा आणि लहान मुलांनाही मज्जा म्हणून विकेंडलाही जंक फूड देणे शक्यतो टाळाच.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना