Join us   

दिवसभरात किती वेळा चहा घ्यावा? चहा प्यायचं योग्य प्रमाण पाहा-चहाचा त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 9:35 AM

Know how many times one should have a tea healthy diet tips : चहा पिणे चांगले की नाही, चहा प्यायला तर तो कोणत्या वेळेला प्यावा, कशा प्रकारे करावा, किती प्रमाणात प्यावा याबाबतच्या काही किमान गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात.

चहा हे आपल्याकडे अमृताप्रमाणे प्यायले जाणारे पेय आहे. झोपेतून उठल्यावर सकाळी सकाळी आपल्यापैकी अनेकांच्या हातात चहाचा कप असतोच असतो. इतकंच नाही तर आंघोळ झाल्यावर, नाश् करताना, घराबाहेर पडताना असा सकाळच्या वेळातच ४ वेळा तरी चही होतो. दिवसभर ऑफीसमध्ये किंवा आणखी कुठे असलो तरीही किमान ४-५ वेळा तरी चहा घेतलाच जातो. संध्याकाळी घरी आल्यावरही हात-पाय धुतल्यावर अनेकांना सगळ्यात आधी चहाचा कप हातात लागतो (Know how many times one should have a tea healthy diet tips). 

अगदी अर्धा कप, कटींग असा म्हटला तरी चहावर चहा घेतल्याने शरीराला बरेच अपाय होतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असते. पण तरतरीत वाटण्यासाठी किंवा लहर म्हणून हा चहाचा कप घेतलाच जातो आणि मग हळूहळू त्याचेही व्यसन लागायला सुरूवात होते. काही जण कोरा चहा घेतात, काही जण ग्रीन टी, लेमन टी यांसारखे चहाचे वेगवेगळे प्रकारही घेतले जातात. मग चहा पिणे चांगले की नाही, चहा प्यायला तर तो कोणत्या वेळेला प्यावा, कशा प्रकारे करावा, किती प्रमाणात प्यावा याबाबतच्या काही किमान गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. पाहूयात दिवसभरात नेमका कितीवेळा चहा घेतलेला आरोग्यासाठी ठीक असतो. 

अहवाल काय सांगतो?

 सकाळी आणि संध्याकाळी अशा २ वेळी तर आवर्जून चहा घेतलाच जातो. पण कोणाकडे गेलो किंवा बाहेर कोणाला भेटायचे असेल तर त्याहून जास्तवेळा सहज चहा होतो. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडने मेडीकल सेंटर यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार दिवसातून ३ ते ४ कप चहा पिणे आरोग्यासाठी घातक असते. चहामध्ये कॅफिन नावाचा घटक असतो ज्याच्या जास्त प्रमाणात सेवनाने निद्रानाश, छातीत जळजळणे, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार १ ते २ कप चहा घेणे ठीक आहे.

(Image : Google)
 

तसेच तुम्हाला चहा घेतल्याशिवाय सुधरतच नाही असे होत असेल तर हर्बल टी किंवा ग्रीन टी हाही तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. मात्र जास्त प्रमाणात चहा पावडर आणि साखर असलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो. प्रमाणापेक्षा जास्त चहा प्यायल्याने त्याचा हाडांवर विपरीत परीणाम होतो आणि हाडे कमकुवत होतात. तसेच जास्त चहाने शरीरात लोहाची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्हाला चहाची खूप सवय असेल तर त्याचे प्रमाण योग्य त्या मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल