सकाळच्या वेळी अनेकदा आपल्याला इतकी घाई होते की आपण घरातली कामं, स्वयंपाक, नाश्ता सगळं करतो. सगळ्यांना खायला देतो आणि कामाच्या नादात आपलं खाणं बाजूलाच राहतं. मग नंतर उरलेली कामं करता करता आपण उभ्यानेच नाश्ता करतो. त्यानंतर ऑफीसला जायची किंवा इतर काही कामांची घाई असल्याने आपण तसेच धावत-पळत आंघोळीला जातो. खाल्ल्यानंतर आंघोळ केल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे आपल्याला माहित असते. मात्र घाईघाईत वेळा मॅनेज होत नसल्याने आपल्याकडून असे होत राहते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे खाल्ल्यावर आंघोळ केल्याने त्याचा पचनक्रियेवर त्याचा परीणाम होतो. आयुर्वेदिक डॉक्टर नितिका कोहली यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे, त्या सांगतात (Know How Our Digestion and Bathing are Connected)...
१. आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन व्हावे यासाठी आपल्या शरीरातील अग्नी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. अग्नी चांगला प्रज्वलित असेल तर अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होते. खाल्ल्यावर अग्नि प्रज्वलित होतो आणि त्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह वाढतो. अन्नाचे योग्यरितीने पचन व्हावे यासाठी असे होणे गरजेचे असते. मात्र हा रक्तप्रवाह वाढला नाही तर अन्नाचे नीट पचन होत नाही आणि पचनाशी निगडीत समस्या निर्माण होतात.
२. आंघोळीमुळे पचनाग्नी थंड होतो. आंघोळीनंतर आपले पोर्स बंद होतात आणि पोटाच्या आसपास रक्तप्रवाह वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आयुर्वेदात खाण्याच्या आधी आंघोळ करण्यास सांगितले आहे. पचनाग्नी थंड झाला तर ब्लोटींग आणि गॅसेसच्या समस्या निर्माण होतात. आंघोळीमुळे शरीर थंड झाल्याने पचनक्रिया मंदावते आणि त्याचा एकूण आरोग्यावर चुकीचा परीणाम होतो. म्हणूनच आंघोळ झाल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी चांगले नसते.