आपल्या भावना या आपल्या आरोग्यावर परीणाम करत असतात. आपण आनंदी असताना आपल्या आवडीचे आणि जे आहे ते मनापासून खातो. मात्र हेच आपण निराश किंवा उदास असू तर मात्र आपल्यासमोर आपल्या कितीही आवडीचा पदार्थ असेल तर आपण तो मनापासून खात नाही. जे अन्न आपण मनापासून खात नाही ते आपल्याला म्हणावे तसे पचत नाही. मानसिक आरोग्याचा किंवा भावनांचा आपल्या पचनशक्तीशी थेट संबंध असतो. आपण रागात असताना किंवा डिप्रेशनमध्ये असताना काही खाल्लं तर ते आपल्याला नीट पचत नाही. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगने केलेल्या संशोधनातून आतड्याचे आणि मेंदूचे कनेक्शन असते. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डींपल जांगडा याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देतात(Know How Our Emotions Affect on our Digestion).
राग, चिंता, उदासी, उत्साह - या सर्व भावना आतड्यातील लक्षणे उत्तेजित करू शकतात. मेंदूचा पोट आणि आतड्यांवर थेट परिणाम होतो. उदाहरणार्थ, खाण्याच्या विचाराने अन्नपदार्थ पोटात जाण्यापूर्वी पोटातील रस बाहेर पडू शकतो. हे कनेक्शन दोन्ही मार्गांनी होते. त्रासलेले आतडे मेंदूला सिग्नल पाठवू शकतात, त्याचप्रमाणे त्रासलेला मेंदू आतड्याला सिग्नल पाठवू शकतो. एखाद्या व्यक्तीचे पोट किंवा आतड्यांसंबंधी त्रास हे चिंता, तणाव किंवा नैराश्याचे कारण असतात.
जेव्हा आपण रागावलेले असतो किंवा तणावात असतो तेव्हा शरीर "लढा आणि उड्डाण" असे या ताणाला प्रतिसाद देते, ज्यामुळे कोर्टिसोलची पातळी वाढते आणि परिणामी पचन प्रक्रिया बंद होते. त्यामुळे शरीराला अन्न पचणे आणि पोषक तत्वे शोषून घेणे कठीण होते. मात्र, जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपली पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था कार्य करते, कॉर्टिसोलची पातळी कमी होते आणि आपले शरीर सहजपणे अन्न पचवण्यास आणि शोषण्यास सुरवात करते. शरीर, मन आणि भावना यांचा अतिशय जवळचा संबंध असल्याने या सगळ्याचा एकमेकांवर परीणाम होत असतो.
जेवणाआधी प्रार्थना करणे अन्नाच्या गुणवत्तेवर परीणाम करतात का?
आपले बोलणे किंवा विचार सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. त्याचा पाण्याशी थेट संबंध लावला असता पाणी गोठल्यावर त्याचे क्रिस्टल एकतर खूप सुंदर दिसतात किंवा खूप वाईट दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा याच्याशी थेट संबंध असतो हे लक्षात घ्यायला हवे. मसारु इमोटो यांनी या विषयावर एक प्रयोग केला असून त्यातूनही त्यांना हाच निष्कर्ष मिळाला आहे.
जर तुम्हाला राग आला असेल तर एक दीर्घ श्वास घ्या, स्वतःला शांत करा. एक ग्लास पाणी प्या आणि नंतर जेवण करा. जेवण मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेवण करण्यापूर्वी प्रार्थना करा. अन्नाला, ज्या हातांनी ते बनवले त्यांना आणि ज्या शेतकऱ्यांनी ते तुमच्या टेबलावर ठेवले त्यांना आशीर्वाद द्या. म्हणजे तुम्ही स्वत:ला चांगले आरोग्य देऊ शकता.