Join us   

आपल्यालाही अचानक हार्ट ॲटॅक तर येणार नाही अशी भीती वाटते? रोज करा फक्त १ उपाय, सांभाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 11:31 AM

Know How Sleep Is Important For Good Heart Health : झोप पूर्ण झाली तरच हृदयाचं काम सुरळीत होतं...

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक. हृदयाचं कार्य सुरळीत असेल तरच शरीर सुरू असतं. पण या कामात काही अडथळा आला तर मात्र आपलं जीवन थांबण्याची शक्यता असते. या हृदयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात असणे आवश्यक असते. इतकेच नाही तर आपला रक्तदाब आणि इतर गोष्टीही व्यवस्थित असतील तर हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. हल्ली कमी वयात हार्ट ॲटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामागे विविध कारणे आहेत. म्हणूनच हृदयरोग बळावू नये यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे गरजेचे असते. आहार, झोप, व्यायाम या किमान गोष्टींकडे आपण वेळीच लक्ष दिले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते (Know How Sleep Is Important For Good Heart Health). 

(Image : Google)

हृदयाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी इतर गोष्टींबरोबरच पुरेशी झोप होणंही गरजेचं असतं. जर्नल ऑफ अमेरीकन हार्ट हेल्थमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, झोप कमी झाल्याने फक्त अस्वस्थता येते किंवा दिवस चांगला जात नाही असे नाही. तर पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा आपल्या हृदयावर विपरीत परीणाम होतो. यामुळे कालांतराने हृदयाच्या कार्यात अ़डथळे येण्याचीही शक्यता असते. सामान्यपणे व्यक्तीला ७ ते ९ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. पण कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, सोशल मिडीयाचा अतिवापर यांमुळे झोपेचे तास नकळत कमी होतात आणि त्याचा शरीरावर परीणाम होतो. व्यक्तीने कमी वेळ झोप घेतली तर त्याचा २४ तासातील ब्लड प्रेशरवर परीणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

रात्रीची झोप पूर्ण होण्यासाठी काय कराल? 

१. जेवण आणि झोपेच्या मधे किमान १.५ ते २ तासाचा कालावधी ठेवा.

२. रात्री झोपताना मोबाइल पाहत असाल तर ते टाळा

(Image : Google)

३. झोपताना डोळे मिटून दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी, घटना आठवण्याचा प्रयत्न करा. 

४. जेवण झाल्यावर शतपावली करायला विसरु नका. 

५. मन शांत राहण्यासाठी आपल्या आवडीची गाणी ऐकणे, वाचन करणे किंवा ध्यान करणे अशा गोष्टी जरुर करा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग