Join us   

हवाबदल झाला की लगेच सर्दी-तापाने आजारी पडता? करा फक्त २ गोष्टी, झटपट वाढेल इम्युनिटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 2:17 PM

Know How To Boost Immunity for Good Health : प्रतिकारशक्ती चांगली तर आरोग्य चांगले, नाहीतर सतत आजारपणं...

आपल्या आजुबाजूला असे अनेक जण असतात जे सतत काही ना काही कारणाने आजारी पडत असतात. या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे असं आपण अगदी सहज म्हणूनही जातो. पण ही प्रतिकारशक्ती कमी असणे म्हणजे नेमके काय तर वातावरणात असलेल्या विषाणूंशी सामना करायला त्यांचे शरीर सक्षम नसते. त्यामुळे हवेत किंवा वातावरणात थोडा बदल झाला की या व्यक्तींना लगेचच सर्दी ताप होतो. मग डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेणे याशिवाय पर्याय राहत नाही. पण अशाप्रकारे सतत औषधे घेणेही आरोग्यासाठी म्हणावे तितके चांगले नसते. मात्र आजारी पडल्यावर पर्यायच नसल्याने डॉक्टरांकडे जावेच लागते. कुपोषण, अनुवंशिकता, शरीरात आवश्यक घटकांची कमतरता असणे, चुकीचा आहार, अपुरी झोप, व्यसनाधिनता ही यामागील प्रमुख कारणे असून जीवनशैली चांगली ठेवणे हा यावरील उत्तम उपाय आहे (Know How To Boost Immunity for Good Health) . 

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं? 

१. प्रतिकारशक्ती चांगली असण्यासाठी आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची पातळी चांगली असणे अतिशय आवश्यक असते. व्हिटॅमिन डी हे एक प्रकारचे व्हिटॅमिन तर आहेच पण ते हार्मोनही आहे. तसेच व्हिटॅमिन डी ने शरीरात योग्य रितीने काम करावे यासाठी मॅग्नेशियमचीही आवश्यकता असते. म्हणूनच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन डी बरोबरच मॅग्नेशियमची पातळी चांगली असणेही तितकेच महत्त्वाचे असते. 

(Image : Google)

२. शरीराला व्हिटॅमिन डी मिळावे यासाठी सकाळी ८ ते १० या वेळात १० ते १५ मिनीटे सूर्यप्रकाशात जरुर बसायला हवे. याशिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डीची सप्लिमेंटस घ्यायला हवीत. तसेच मॅग्नेशियम भरपूर असलेला आहार घ्यावा. सकाळी उठल्यावर न चुकता ५ भिजवलेले बदाम खावेत. यामध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी याचा उपयोग होतो. याबरोबरच चिया सीडसचे पाणी घेतल्यास त्याचाही अतिशय चांगला फायदा होतो. तसेच पालक, बीन्स, केळं, नटस आणि सीडस यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल