Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात कॉन्स्टीपेशनमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ३ घरगुती उपाय, औषधाशिवाय पोट होईल साफ...

हिवाळ्यात कॉन्स्टीपेशनमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ३ घरगुती उपाय, औषधाशिवाय पोट होईल साफ...

Know How to take care for constipation problem in winter : सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 04:17 PM2023-12-11T16:17:01+5:302023-12-11T16:20:48+5:30

Know How to take care for constipation problem in winter : सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत.

Know How to take care for constipation problem in winter : Constipation in winter makes it difficult to clear the stomach? 3 Home Remedies, Stomach Will Be Clear Without Medicines... | हिवाळ्यात कॉन्स्टीपेशनमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ३ घरगुती उपाय, औषधाशिवाय पोट होईल साफ...

हिवाळ्यात कॉन्स्टीपेशनमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ३ घरगुती उपाय, औषधाशिवाय पोट होईल साफ...

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर पोट वेळच्या वेळी साफ होणं अतिशय गरजेचं असतं. पोट साफ झालं की आपल्याला नकळत फ्रेश वाटते. पण पोटात घाण तशीच असेल तर अस्वस्थ वाटत राहतं. पण पोट साफ नसेल तर बद्धकोष्ठता, गॅसेस, मूळव्याध, वजन वाढणे किंवा कमी होणे, ऍसिडिटी यांसारख्या तक्रारी सतत मागे लागतात. आहाराच्या चुकीच्या पद्धती, झोपेचा अभाव,  पाणी कमी पिणे यांसारख्या गोष्टींमुळे अनेकांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. थंडीच्या दिवसांत तर कॉन्स्टीपेशन म्हणजेच पोट साफ व्हायला त्रास होणे ही अतिशय सामान्य समस्या असते (Know How to take care for constipation problem in winter). 

थंडीमुळे नकळत आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते यामुळे मलातील द्रवगुण कमी होतो व कठीण मलप्रवृत्ती होण्यास सुरुवात होते. एखादवेळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणं ठिक असलं तरी हा त्रास सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत. बरेचदा कॉन्स्टीपेशन झाल्यावर डॉक्टर ल्युब्रिकेटीव्ह औषधे देतात. यामुळे ही समस्या दूर होते, मात्र पुन्हा काही काळाने हा त्रास सुरू होतो. तसेच ही औषधे सतत घेतल्याने त्यांची सवय लागण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे काही आयुर्वेदीक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. या उपायांचे साईड इफेक्टसही नसल्याने ते फायदेशीर असतात.पाहूयात हे उपाय कोणते...

(Image : Google)
(Image : Google)

१. थंडीच्या काळात रात्री झोपताना कोमट दूध-तूप, कोमट पाणी यांचे आवर्जून सेवन करावे. त्यामुळे जड कोठा हलका होण्यास आणि मल बाहेर पडण्यास मदत होते.आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास मल मोकळा होण्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे दर काही वेळाने आठवणीने पाणी पिणे, गरम सूप, वरण, सार अशा गोष्टींचा समावेश आहारात वाढवायला हवा.  

२. भाजलेली बडीशेप, इसबगोल आणि हरीतकी (हरडे पावडर) हे तिन्ही सम प्रमाणात एकत्र करायचे. दुपारच्या जेवणाआधी गरम पाण्यासोबत अर्धा चमचा आणि रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी अर्धा चमचा असे न चुकता घ्यायचे. त्रास जास्त असेल तर १ चमचा घेतले तरी चालते. मात्र याने पोट साफ होण्यास चांगलीच मदत होत असल्याने हा उपाय जरुर ट्राय करावा. 

३. काळे मनुके, पपई, तूप, सॅलेड, आवळा याबरोबरच पालेभाज्या, सॅलेड, फळं यांचा आहारातील समावेश वाढवणे गरजेचे आहे. तसेच फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. या गोष्टींमुळे जड झालेला कोठा मऊ होण्यास मदत होते आणि पोट साफ होण्यास त्याची मदत होते. पुरेशी झोप आणि ताणतणावांपासून दूर राहणे या गोष्टींकडेही आवर्जून लक्ष द्यायला हवे. 

 
 

Web Title: Know How to take care for constipation problem in winter : Constipation in winter makes it difficult to clear the stomach? 3 Home Remedies, Stomach Will Be Clear Without Medicines...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.