Join us   

थंडीत टाचांना खूप भेगा पडल्या, पायांची आग होते? ४ सोपे उपाय, भेगा होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 5:32 PM

Know how to take care of Cracked heels in winter season : आरोग्याच्या दृष्टीने पायांच्या भेगा हे त्रासदायक प्रकरण असते तसेच भेगांमुळे सौंदर्यातही बाधा येते.

थंडीच्या दिवसांत पायांना भेगा पडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे.भेगा पडलेले पाय दिसायला तर खराब दिसतातच पण त्या भेगांमध्ये माती गेल्याने किंवा त्यांची सालपटे जास्त प्रमाणात निघाल्याने या भेगांची आगही होते. भेगांची समस्या काही वेळा अनुवंशिक असते तर काही वेळा कोरडेपणा, सतत मातीत काम आणि पायांकडे दुर्लक्ष केल्याने भेगा वाढतात.  काही वेळा या भेगा इतक्या वाढतात की एखादं क्रिम लावलं किंवा काही घरगुती उपाय केले तरी यापासून आराम मिळत नाही. आरोग्याच्या दृष्टीने पायांच्या भेगा हे त्रासदायक प्रकरण असते तसेच भेगांमुळे सौंदर्यातही बाधा येते. थंडीच्या दिवसांत पायाच्या भेगा कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. घरच्या घरी काही सोप्या गोष्टी केल्यास या भेगा कमी होण्यास निश्चितच मदत होते. हे उपाय कोणते आणि ते नेमके कसे करायचे याबाबत समजून घेऊया (Know how to take care of Cracked heels in winter season)... 

१. भेगा कमी होण्यासाठी आणि भेगांमधूल घाण निघण्यासाठी कोमट पाण्यात पाय १० मिनीटांसाठी बुडवून ठेवावेत.यामुळे पायांचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेला ओलावा मिळून त्वचा मऊ राहण्यास मदत होते.त्यानंतर मॉईश्चरायजर किंवा तेल लावून ठेवा. 

(Image : Google)

२. नारळाचं तेल पाय आणि घोट्यासाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. पाय गुळगुळीत राहण्यासाठी आणि पायाची त्वचा निघून सालपटे निघू नयेत यासाठी रोज झोपताना याचा वापर करा. यामध्ये बदाम तेल, तीळाचे तेल असे कोणतेही तेल घेऊ शकतो. 

३. टाचांच्या भेगा आणि त्यातील घाण निघून जाण्यासाठी बाजारात खडबडीत असे दगड मिळतात, तसेच पाय घासण्यासाठी काही खास पद्धतीचे ब्रशही मिळतात. त्यांचा वापर करुन भेगा काढण्याचा प्रयत्न करा. 

४. टाचांचे एक्सफॉलिएशन करणेही अतिशय महत्त्वाचे असल्याने साखर आणि मध, कॉफी आणि कोरफडीचा गर यांसारख्या गोष्टींनी टाचांना आलेल्या भेगा घासून काढायला हव्यात. त्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि पाय गुळगुळीत होतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजी