Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सोय म्हणून तुम्हीही चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरता? हे कप आरोग्यासाठी घातक, कारण...

सोय म्हणून तुम्हीही चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरता? हे कप आरोग्यासाठी घातक, कारण...

Know How using disposable cup for tea and coffee are harmful for health : सोय म्हणून हे कप वापरणे सोपे असले तरी त्यातून शरीरात घातक घटक जातात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 04:01 PM2023-12-25T16:01:16+5:302023-12-25T16:02:37+5:30

Know How using disposable cup for tea and coffee are harmful for health : सोय म्हणून हे कप वापरणे सोपे असले तरी त्यातून शरीरात घातक घटक जातात...

Know How using disposable cup for tea and coffee are harmful for health : Do you also use disposable cups for tea and coffee for convenience? These cups are hazardous to health because... | सोय म्हणून तुम्हीही चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरता? हे कप आरोग्यासाठी घातक, कारण...

सोय म्हणून तुम्हीही चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरता? हे कप आरोग्यासाठी घातक, कारण...

चहा किंवा कॉफी हे अनेकांसाठी अमृतासमान असते. कोणाला भेटायचे असेल, ऑफीसच्या कामातून ब्रेक हवा असेल किंवा अगदी कोणत्याही कारणासाठी अगदी सहज चहा किंवा कॉफी घेतली जाते. थंडीच्या दिवसांत तर गारठ्यामुळे चहा-कॉफी घेण्याचे प्रमाण वाढते. घरात आपण काचेच्या कपातून चहा पितो पण ऑफीसमध्ये किंवा टपरीवर आपण डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पितो. हे कप वापरायला सोपे असल्याने साहजिकच ते सर्रास वापरले जातात. एकदा वापरुन झाले की हे कप फेकून दिले जात असल्याने धुण्याची चिंता नसते. तसेच त्याची किंमतही कमी असते आणि वजनाने हलके असल्याने ते वापरणे सोयीचे असते. हे जरी खरे असले तरी हे कप वापरणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. आरोग्याला यामुळे कोणते अपाय होतात पाहूया (Know How using disposable cup for tea and coffee are harmful for health)...

(Image : Google)
(Image : Google)

१. प्लास्टीक ग्लासच्या आतमध्ये एकप्रकारचा प्लास्टीकचा थर असतो. यामध्ये मेट्रोसेमिन आणि बिस्फीनॉल असे आरोग्यासाठी अतिशय घातक असे घटक असतात. ज्यावेळी आपण यामध्ये गरम चहा किंवा कॉफी घालतो तेव्हा हे घटक वितळतात आणि चहामध्ये मिसळले जातात. त्यामुळे नकळत आपल्या पोटात प्लास्टीक जाते. 

२. हे विषारी रासायनिक घटक पोटात गेल्याने आतड्यांना इजा होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या प्लास्टीकच्या कणांमुळे डायरीयासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

३. या कपांतील प्लास्टीकमुळे किडणीवर गंभीर परीणाम होण्याची शक्यता असते. तसेच गर्भवती महिलांनी या ग्लासचा वापर केल्यास त्यांच्या पोटात असणाऱ्या अर्भकावरही या रसायनांचा विपरीत परीणाम होऊ शकतो.   

(Image : Google)
(Image : Google)

४. प्लास्टीकऐवजी बरेच जण कागदी किंवा थर्माकोलचे डिस्पोजेबल कपही वापरतात. मात्र या कपांच्या आतही प्लास्टीकसारखा एक थर असतो तो हायड्रोफोबिक फिल्मचा असतो.  हा थरही आरोग्यासाठी घातक असून ते कपही वापरणे धोक्याचेच असते.

Web Title: Know How using disposable cup for tea and coffee are harmful for health : Do you also use disposable cups for tea and coffee for convenience? These cups are hazardous to health because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.