Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसभरात कोणत्या वेळेला फळं खाल्लेली जास्त चांगली? आहारतज्ज्ञ सांगतात, फळांतून जास्त पोषण मिळण्यासाठी...

दिवसभरात कोणत्या वेळेला फळं खाल्लेली जास्त चांगली? आहारतज्ज्ञ सांगतात, फळांतून जास्त पोषण मिळण्यासाठी...

Know the best time to eat fruits according to a nutritionist diet tips : फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी ती खाण्याचे काही किमान नियम असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 01:23 PM2024-01-23T13:23:18+5:302024-01-23T13:24:24+5:30

Know the best time to eat fruits according to a nutritionist diet tips : फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी ती खाण्याचे काही किमान नियम असतात.

Know the best time to eat fruits according to a nutritionist diet tips : What time of the day is best to eat fruit? Nutritionists say, to get more nutrition from fruits... | दिवसभरात कोणत्या वेळेला फळं खाल्लेली जास्त चांगली? आहारतज्ज्ञ सांगतात, फळांतून जास्त पोषण मिळण्यासाठी...

दिवसभरात कोणत्या वेळेला फळं खाल्लेली जास्त चांगली? आहारतज्ज्ञ सांगतात, फळांतून जास्त पोषण मिळण्यासाठी...

आपण आहारात फळं, भाज्या, डाळी, धान्य, कडधान्य अशा सगळ्या गोष्टींचा समावेश करतो. शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळावेत हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. पण आहारात या सगळ्याचा समावेश करत असताना ते किती प्रमाणात, कोणत्या वेळेला आणि कशा पद्धतीने खावे याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच असं नाही. म्हणूनच आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात काही लहानमोठे बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. फळं हा जीवनसत्त्व, खनिजं आणि इतर अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत असल्याने फळं नियमितपणे खायला हवीत. लहान मुलं, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरीक किंवा आजारी व्यक्तींना अन्न जात नसेल तर आवर्जून फळं खाण्यास सांगितले जाते (Know the best time to eat fruits, according to a nutritionist diet tips). 

आपण आहारात विविध चवीच्या, रंगांच्या फळांचा समावेश करतो. विशिष्ट सिझनमध्ये बाजारात येणारी आणि स्थानिक ठिकाणी पिकणारी किमान २ फळं आवर्जून खायला हवीत असं म्हटलं जातं. फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी ती खाण्याचे काही किमान नियम असतात. ते नियम न पाळता आपण फळं खाल्ली तर त्यातून शरीलाचे पोषण होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता असते.आहारात फळांचा समावेश करताना ती कोणत्या वेळेला, कशा पद्धतीने, किती प्रमाणात खायला हवीत याबाबतच्या काही गोष्टी लक्षात घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.  

(Image : Google)
(Image : Google)

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात...

१. फळं खाण्याची सगळ्यात योग्य वेळ ही सूर्यास्त होण्याच्या आधीची आहे. म्हणजेच संध्याकाळच्या आधी दिवसभरात आपण फळं खायला हवीत. 

२. बरेच जण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी फळ खातात. पण रिकाम्या पोटी फळ खाणे योग्य नाही, त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. तर पहिले खाणे म्हणून आहारात प्रोटीन्स आणि फॅटस घ्यायला हवेत आणि मग फळं खाल्ली तरी चालतील.

३. सकाळच्या वेळात म्हणजेच नाश्ता झाल्यावर आणि जेवणाच्या आधी फळं खात असाल तर साधारणपणे बेरीज, केळी, व्हिटॅमिन सी असलेली आंबट फळे खायला हवीत. तर संध्याकाळी फळं खाणार असाल तर सफरचंद, पेर अशी फायबरयुक्त फळं खायला हवीत. 

४. परदेशात मिळणारी किवी, ड्रॅगन फ्रूट, अॅव्हाकॅडो यांसारखी फळे खाण्यापेक्षा आपण राहतो त्या ठिकाणी पिकणारी सिताळफ, पपई, संत्री, केळी, बोरं, जांभूळ, आंबा, फणस अशी स्थानिक फळं खाणं केव्हाही आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगले असते.  

Web Title: Know the best time to eat fruits according to a nutritionist diet tips : What time of the day is best to eat fruit? Nutritionists say, to get more nutrition from fruits...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.