सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.
पानांमध्ये मधुमेह-विरोधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक-विरोधी, व्रण-विरोधी आणि संसर्ग-विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात 1.3 मायक्रोग्रॅम आयोडीन, 4.6 मायक्रोग्रॅम पोटॅशियम, 1.9 मोल्स किंवा 2.9 एमसीजी व्हिटॅमिन ए, 13 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी1 आणि 0.63 ते 0.89 मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति 100 ग्रॅम असते.
यासंदर्भात, 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी सुपारीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे(Know the health benefits of betel leaves).
विड्याचे पान - बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
विड्याचे पान अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान रामबाण -उपाय म्हणून मानला जातो. यासाठी सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.
कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल
सुपारीच्या पानांचे इतर फायदे
श्वासाची दुर्गंधी व दातांचा पिवळेपणा होईल दूर
सुपारीच्या पानांमध्ये अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणानंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.
श्वसन प्रणालीसाठी फायदेशीर
खोकला, ब्राँकायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
मुझे नींद ना आये..रात्र रात्र झोपेसाठी तळमळता? ४ टिप्स, स्ट्रेस होईल कमी-गाढ झोप लागेल
मधुमेह नियंत्रित करते
सुपारीच्या पानांमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात. टाईप 2 मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी त्याची पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.