मेमरी वाढवण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून मिळतो. बदाम खाण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच बदाम खायला आवडतो. प्रत्येकजण बदाम वेगवेगळ्या प्रकारे खातात. काही लोकांना रात्रभर भिजवलेले बदाम खायला आवडतात तर, काहींना कच्चे बदाम खायला आवडतात. सध्या उन्हाळा सुरु आहे, बदाम गरम असल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. मग उन्हाळ्यात बदामाचे सेवन कसे करावे? हा प्रश्न उद्भवतो.
यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''कच्चे बदाम शरीरात उष्णता निर्माण करतात. उन्हाळ्यात बदामाचे सेवन केल्यास पित्त दोष होऊ शकते. शरीरात उष्णता वाढली की, त्वचेवर पुरळ, मूळव्याध यांसारख्या समस्या वाढतात. म्हणूनच कच्च्या बदामाऐवजी रात्रभर भिजवलेले बदाम खावेत''(Know the Right Way to Consume Almonds, Especially in Summer).
बदामामधील पौष्टीक घटक
बदामामध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा ३, फॅटी ऍसिडसारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. हे सर्व पोषक तत्व शरीराच्या उत्तम कार्यासाठी आवश्यक आहेत. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
भयंकर उकाडा, रात्री झोपच लागत नाही? ७ उपाय- घाम कमी-झोपही लागेल शांत
भिजवलेले बदाम पोटाची उष्णता शांत करतात
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या वाढतात, व कच्चे बदाम खाल्ल्याने शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. त्यामुळे कच्चे बदाम खाण्याऐवजी भिजवलेले बदाम खा. भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात. याशिवाय शरीरातील उष्णताही कमी करतात. बदाम भिजवल्याने पित्तदोषाची समस्या कमी होते, यासह पचनाच्या समस्याही दूर होतात.
बदाम खाण्याच्या आधी साली काढून खा
भिजवलेले फ्रेश बदामाचे साल काढून खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, जे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण रोखते.
१ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!
केस व त्वचेसाठी फायदेशीर
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बदामामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असते. सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्यास दिवसभर जास्त भूक लागत नाही.
ब्लड शुगर राहील कंट्रोल
बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळते. बदाम खाणे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
दररोज किती बदाम खावे
जर आपण नुकतेच बदाम खाण्यास सुरुवात केली असेल तर, दररोज २ भिजवलेले बदाम खा. त्याच्या १० दिवसानंतर ५ बदाम खा. २१ दिवसानंतर १० बदाम खा. व ९० दिवसानंतर १२ ते २० खा.