आजकाल वृद्धांपासून तरूणांपर्यंत सर्वांनाच पाठदुखीचा त्रास जाणवतो. सतत एकाच ठिकाणी बसून कंबर-पाठीचे स्नायू दुखू लागतात. (Healthy Ladoo Recipe) अशा स्थितीत पौष्टीक खाण्यापिण्याची आवश्यकता असते. तुम्ही सकाळीपासून रात्रीपर्यंत काय खाता याकडे लक्ष दिले नाही तर तब्येतीचे गंभीर विकार उद्भवू शकतात. नाचणी, ज्वारी, बाजरी अशा पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पण जर तुम्हाला पोळी किंवा भाकरी खायला आवडत नसेल बीया, धान्य अशा पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (How To Make Energy Booster Ragi Ladoo) तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन बोअर झालं असेल तर नाचणीचे लाडू ट्राय करू शकता. पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा नाचणीच्या पीठाचे लाडू खाऊ शकता
नाचणी एंटीऑक्सिडंट्सचा पॉवरहाऊस आहे. नाचणीत कॉम्पलेक्स व्हिटामीन्स, थियामीन, रिबोफ्लावीन, नियासिन, फॉलिक एसिड असते. ज्यामुळे हाडांना आणि स्नायूंना पोषण मिळते. नाचणीत प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते, व्हिटामीन्स असतात. (Ref) नाचणी कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असून ग्लुटेन फ्री असते. नाचणीच्या सेवनाने त्वचा आणि केसही चांगले राहतात. रक्ताची कमतरता असल्यास रोज नाचणी खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते.
नाचणीचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Ragi Ladoo)
१) नाचणीचे पीठ - 1 कप
२) पिठी साखऱ - अर्धा कप
३) साजूक तूप- अर्धा कप
४) बदाम - 10 ते 15
५) काजू - 7 ते 8
६) अक्रोड 2 ते 3
७) मनुके 7 ते 8
८) डिंक- 1 वाटी
नाचणीचे लाडू कसे करायचे? (How To Make Ragi Ladoo)
1) नाचणीचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये काजू आणि बदाम घालून रोस्ट करून घ्या. नंतर थंड झाल्यानंतर छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यासोबत अक्रोड आणि मनुकेसुद्धा मिक्स करू सकता.
2) जर तुम्हाला या व्यतिरिक्त इतर ड्राय फ्रुट्स आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. जेव्हा नाचणीचं पीठ भाजलं जाईल तेव्हा त्यातून चांगला सुगंध येईल नंतर गॅस बंद करा.
किचनमध्ये सतत मुंग्यांच्या रांगा लागतात? घरात ५ गोष्टी ठेवा, २ मिनिटांत गायब होतील मुंग्या
3) भाजलेल्या नाचणीच्या पीठात चिरलेले ड्राय फ्रुट्स मिसळा. नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. जेव्हा थंड होईल तेव्हा त्यात पिठीसाखर मिसळा. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा आहारात समावेश करू शकता.
4) साखर आणि गुळाचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त करा. दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्यवस्थित लाडू वळून घ्या लाडू बांधण्यासाठी हाताला साजूक तूप लावा. नंतर लाडू वळून घ्या. तयार आहे स्वादीष्ट नाचणीचे लाडू.