Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:28 PM2022-02-04T19:28:41+5:302022-02-04T19:29:39+5:30

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे..

Late night dinner and bed timing disturbs blood sugar level and cause diabetes | रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Highlightsरात्रीचं जेवण खूप उशीरा घेतल्यामुळे रक्तातील melatonin या घटकाची पातळी बिघडते आणि त्याच्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण असंतूलित होतं

हल्ली बहुतेक जणांचे रुटीनच असं झालं आहे की काम संपवून ऑफिसमधून घरी यायलाच रात्री ८- ९ वाजतात. त्यापुढे मग थोडा वेळ रिलॅक्स होऊन रात्री ९ ते १० या दरम्यान जेवण केलं जातं.. दिवसभर काम करून प्रचंउ थकवा आलेला असतो. त्यामुळे मग रात्री जेवण करताच डोळे लागू लागतात आणि जेवण ते झोप यामध्ये जेमतेम अर्ध्या तासाचं पण अंतर राहात नाही. पण हीच आपली सवय आपल्यासाठी घातक ठरणारी आहे, असा निष्कर्ष काही संशोधनातून काढण्यात आला आहे.

 

Massachusetts General Hospital (MGH), Brigham, Women’s Hospital (BWH) आणि स्पेनमधील the University of Murcia यांच्यावतीने नुकताच एक सर्व्हे करण्यात आला असून ‘Diabetes Care’ या नावाने तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की रात्रीचं उशीराचं जेवण आणि रक्तातील वाढलेली साखरेखी पातळी म्हणजेच डायबेटीज यांचा खूप जवळचा संबंध असून या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. रात्रीचं जेवण खूप उशीरा घेतल्यामुळे रक्तातील melatonin या घटकाची पातळी बिघडते आणि त्याच्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण असंतूलित होतं आणि कमी वयात डायबेटीज होण्याचा धोका निर्माण होतो, असं हा अभ्यास करणाऱ्या रिचा सक्सेना यांनी सांगितलं. 

 

या संदर्भात स्पेनमध्ये ८४५ लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये प्रत्येकाच्या melatonin receptor या जनुकीय घटकाचाही अभ्यास करण्यात आला. प्रयोगादरम्यान काही लोकांना रात्रीचं जेवण उशिरा देण्यात आलं तर काही जणांना लवकर देण्यात आलं.. काही दिवस सतत हा प्रयोग केल्यानंतर या दोन्ही गटातल्या व्यक्तींच्या ब्लड- शुगर लेव्हलमध्ये खूपच फरक असल्याचं प्रकर्षाने दिसून आलं. उशीरा जेवण करणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर जेवण करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ३.५ टक्क्यांनी जास्त होते, असं सक्सेना यांनी सांगितलं. 

 

ज्यांना ऑफिसमुळे अजिबातच जेवणाच्या वेळा पाळणं शक्य नाही, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्रीच्या जेवणात बदल करावा. पण ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यात कमीतकमी २ तासांचं तरी अंतर ठेवावं, असं या संशोधकांचं मत आहे. रात्री जेवल्याजेवल्या लगेच झोपल्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्याचा परिणाम शरीरात ग्लुकोज निर्मिती होणे आणि इन्सूलिनचे सिक्रिशन यावर होतो. त्यामुळे जेवण आणि झोप यांच्यात ३ तासांचं अंतर असावं, असं आपल्याकडेही आयुर्वेदात सांगण्यात आलेलंच आहे..


 

Web Title: Late night dinner and bed timing disturbs blood sugar level and cause diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.