Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

Lifestyle Changes Can Help Kids Prevent Type 2 Diabetes : पुढे जाऊन मुलांना मधुमेहाचा त्रास होऊ नये म्हणून गरोदरपणातच काही गोष्टींची काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 05:44 PM2024-11-07T17:44:09+5:302024-11-07T17:45:37+5:30

Lifestyle Changes Can Help Kids Prevent Type 2 Diabetes : पुढे जाऊन मुलांना मधुमेहाचा त्रास होऊ नये म्हणून गरोदरपणातच काही गोष्टींची काळजी घ्या..

Lifestyle Changes Can Help Kids Prevent Type 2 Diabetes | लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

पांढरी साखर आरोग्यासाठी घातक मानली जाते (Sugar). जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यानं शरीरात अनेक नकारात्मक बदल घडतात (Diabetes). ज्यामुळे डॉक्टर लहान मुलांच्या आहारात कमी साखरेचा समावेश करण्याचा सल्ला देतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, जर एखाद्या मुलाला पहिले १००० दिवस कमी साखरेचा आहार दिला तर त्याच्या तारुण्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका (Blood Pressure) कमी होऊ शकतो. एवढेच नाही तर गरोदरपणात महिलेने कमीत कमी साखर खाल्ली तर त्याचा फायदा मुलाच्या आरोग्यालाही होऊ शकतो.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार , कॅलिफोर्निया आणि मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यात असे आढळून आले की, जर गर्भवती महिलेने तिच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी केले तर, याचा फायदा फक्त तिच्या आरोग्यावरच नसून, मुलाच्या भविष्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. गरोदरपणात साखर कमी प्रमाणात खाल्ल्यास मुलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचाही धोका कमी होतो(Lifestyle Changes Can Help Kids Prevent Type 2 Diabetes).

५ गोष्टींचा त्रास असेल तर कोमट पाणी कधीच पिऊ नका; वजन कमी करण्याच्या नाद पडेल महागात

मुलाच्या आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसांमध्ये, म्हणजे गर्भधारणेदरम्यान आणि जन्मानंतर 2 वर्षांपर्यंत मुलाचा विकास खूप वेगाने होतो. अशा वेळी लहान मुलांना साखर कमी दिल्यास ते निरोगी राहतील आणि भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. यासह सर्वांगीण वाढीमध्येही याचा फायदा होतो.

इन्शुलीनची पातळी योग्य राहते

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, ज्या मुलांना कमी साखरेचा आहार दिला गेला त्यांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यासह वजनही कमी करण्यास मदत होते. आहारात कमी साखरेचं समावेश केल्याने शरीरातील इन्शुलीनची पातळी योग्य राहते. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, गर्भवती महिलेने केवळ चांगला आहार घेणे महत्त्वाचे नाही, तर जन्मानंतरही मुलाच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Web Title: Lifestyle Changes Can Help Kids Prevent Type 2 Diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.