Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफच होत नाही, करपट ढेकर येतात? न चुकता करा ५ गोष्टी, पचनक्रिया होईल सुरळीत

पोट साफच होत नाही, करपट ढेकर येतात? न चुकता करा ५ गोष्टी, पचनक्रिया होईल सुरळीत

lifestyle Tips to improve your digestion process : योगा प्रशिक्षक असलेल्या काम्या इन्स्टाग्रामवर काही उपाय सांगतात, हे उपाय कसे करायचे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 01:39 PM2023-03-20T13:39:19+5:302023-03-20T13:40:53+5:30

lifestyle Tips to improve your digestion process : योगा प्रशिक्षक असलेल्या काम्या इन्स्टाग्रामवर काही उपाय सांगतात, हे उपाय कसे करायचे याविषयी...

lifestyle Tips to improve your digestion process : Stomach not clear, belching? Do 5 things without fail, digestion will be smooth | पोट साफच होत नाही, करपट ढेकर येतात? न चुकता करा ५ गोष्टी, पचनक्रिया होईल सुरळीत

पोट साफच होत नाही, करपट ढेकर येतात? न चुकता करा ५ गोष्टी, पचनक्रिया होईल सुरळीत

पचनक्रिया सुरळीत असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. पण पोट नीट साफ झालेलं नसेल, गॅसेस झाले असतील किंवा जळजळ होत असेल तर मात्र पोटाचे आरोग्य बिघडते. अशा सगळ्या समस्या असतील तर आपल्याला नीट झोप येत नाहीच पण इतरही काही ना काही समस्या निर्माण होत राहतात. मग अॅसिडीटी, जळजळ, गॅसेस असे काही ना काही त्रास होतात. इतकेच नाही तर पोट साफ नसेल तर आपल्या चेहऱ्यावरही फोड येणे, चेहरा काळवंडणे असं काही ना काही होत राहतं. म्हणूनच खाल्लेलं अन्न पचावं यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा अन्नपचन होण्यासाठी आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी चांगला उपयोग होतो. योगा प्रशिक्षक असलेल्या काम्या इन्स्टाग्रामवर काही उपाय सांगतात, हे उपाय कसे करायचे याविषयी (lifestyle Tips to improve your digestion process)...

१. सकाळी उठल्यावर आपण पाणी पितो ते अनेकदा घाईघाईत उभे राहून पितो. किंवा फारतर खुर्चीत बसून पितो. मात्र तसे न करता मलासनात बसून पाणी प्यावे, यामुळे पाणी पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. कोणतेही पदार्थ खाताना ते वेडेवाकडे बसून किंवा लोळून खाऊ नयेत. त्यामुळे ते पचण्यास त्रास होण्याची शक्यता असते. तसेच खूप वेगाने आणि न चावता अन्नपदार्थ खाणेही पचनक्रियेसाठी घातक असते. 

३. जेवण झाल्यानंतर किमान ५ मिनीटे आवर्जून वज्रासनात बसावे. या आसनामुळे खाल्लेले अन्न पचण्यास चांगली मदत होते.

४. सकाळी उठल्यावर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण चहा किंवा कॉफी न घेता ग्लासभर पाणी प्यावे. त्यामुळे पोट साफ होण्यास चांगली मदत होते. 

५. कपालभाती आणि पवनमुक्तासन या योगातील गोष्टी नियमितपणे आवर्जून करायला हव्यात. यामुळे कोठा जड झाला असेल तर तो हलका होण्यास मदत होते. इतकेच नाही तर जळजळ, गॅसेस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

Web Title: lifestyle Tips to improve your digestion process : Stomach not clear, belching? Do 5 things without fail, digestion will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.