What Is Lipedema: आजकाल जास्तीत जास्त महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. मात्र, काही केसेसमध्ये लठ्ठपणा हा लठ्ठपणा नसून काही गंभीर आजारही असू शकतो. लिपिडेमा हा यासंबंधी असाच एक आजार आहे. जो महिलांमध्ये भरपूर वाढत आहे. या स्थितीत शरीराच्या काही अवयवांमध्ये भरपूर फॅट सेल्स जमा होऊ लागतात. खासकरून पाय, कंबर आणि त्या खालचा भाग. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचा आकार मोठा दिसू लागतो.
लिपिडेमा ही समस्या केवळ महिलांना प्रभावित करते आणि ही समस्या किशोरावस्था, गर्भावस्था किंवा मोनोपॉज दरम्यान होते. लिपिडेमा यूकेचा अंदाज असा आहे की, १० पैकी एका महिलेला हा आजार होतो. अशात ही समस्या मॅनेज करण्यासाठी काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
लिपिडेमाची लक्षणं
- लिपिडेमाच्या पहिल्या टप्प्यात त्वचेवर गाठी दिसू लागतात. पण बाहेरून त्वचा मुलायम दिसते. या गाठी संवेदनशील असतात आणि सहजपणे त्यांना इजा होऊ शकते. दुसऱ्या टप्प्यात त्वचेवर छोटे छोटे खड्डे दिसू लागतात. तर तिसऱ्या टप्प्यात मोठे आणि असमान फॅट डिपॉझिट्स दिसू लागतात. मांड्या आणि गुडघ्यांजवळ हे अधिक दिसतात.
रूटीन बिघडतं
लिपिडेमामुळे जॉइंट्समध्ये वेदना आणि प्रभावित अवयवांमध्ये जडपणा जाणवतो. कालांतरानं चालण्या-फिरण्यात समस्या होते आणि जॉइंट्सच्या समस्याही वाढतात.
काय आहेत उपचार?
लिपिडेमा एक अशी स्थिती आहे, ज्यात शरीराच्या फॅट पेशी प्रमाणापेक्षा जास्त जमा होऊ लागतात. त्यामुळे सामान्य फॅट लॉस उपाय जसे की, डाएट आणि एक्सरसाईजनं यावर काही परिणाम होत नाही. योग्य आहार आणि एक्सरसाईजनं ही समस्या अधिक वाढण्यापासून रोखली जाऊ शकते. सध्या तरी लिपिडेमावर कोणताही ठोस उपाय नाही.
लक्षणं कमी करण्याचे उपाय
कंप्रेशन गारमेंट्स- हे अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं ज्यांना वेदना आणि जडपणा अधिक जाणवतो. हे जॉइंट्सना सपोर्ट करतात आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.
मॅन्युअल लिंफॅटिक ड्रेनेज- हा आणखी एक उपाय आहे. जो लिपिडेमाची लक्षणं करण्यास मदत करतो.
लिपोसक्शन- लिपिडेमावर उपचार करण्यासाठी लिपोसक्शन हा एक पर्याय आहे.