Join us   

सतत खाल्ले तर ६ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका, आजच आहार बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 1:47 PM

List of Cancer Causing Food : रोजच्या खाण्यातल्या काही खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादीत प्रमाणात करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड  आजकाल  सर्रास खाल्ले जाते. पण जंक फूड, रेडी टू इट स्नॅक्स यांसारख्या प्रोसेस्ड फूड्सची  चव वाढवण्यासाठी आणि टिकण्यासाठी हानीकारक केमिकल्स, प्रिजर्व्हेटिव्हज आणि आर्टिफिशियल स्विटरनर्सचा वापर केला जातो. यामुळे कॅन्सरसह इतर  गंभीर आजारांचाही धोका वाढतो. (Top 6 Carcinogenic Foods To Avoid )कॅन्सर हा एक घातक आणि जीवघेणा आजार आहे. तुम्ही जे काही खाता-पिता यातून कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.  रोजच्या खाण्यातल्या काही खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादीत प्रमाणात करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (List of Cancer Causing Food)

१) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार मसालेदारअन्न,  तळलेले पदार्थ चिप्स, कुकीज आणि इतर पिवळ्या पदार्थांमध्ये खाण्याचा रंग जास्त वापरला जातो. प्राण्यांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आलं की किडनी आणि आतड्यांच्या ट्युमरचा धोका यामुळे वाढतो. (Cancer causing foods we consume regularly)

२) वनस्पती तेलात सूज निर्माण करणारे पदार्थ असतात.  याव्यतिरिक्त पीनट बटर, ब्रेड, चिप्स, सॅलेड ड्रेसिंग, मार्जरीन यांतही या  तेलाचे जास्त प्रमाण दिसून येते.

३) हॉट डॉग, लंच मीट यात कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ असतात. यामुळे कोलोरेक्टर आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. यात नायट्रेट आणि फॉस्फरेस असते यामुळे धमन्यांवर परिणाम होतो.

४) डायटरी सोडा, ड्रेसिंग, सिरप आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये  सुक्रालोज एक आर्टिफिशियल स्वीटनर्स आहे ते आतड्यांच्या बॅक्टेरियाजसाठी नुकसानकारक ठरते. सुक्रालोज मायग्रेन, मूड खराब होणं, सूज येणं यासाठी कारणीभूत ठरते यामुळे धमन्यांवर परिणाम होतो.

५) मोनोसोडियम ग्लूटामेट (एमएसजी) हा पदार्थ फ्रोजन फूड, चिप्स आणि फास्ट फूडमध्ये दिसून येतो. चव वाढवण्यासाठी हा पदार्थाचा वापर केला जातो. पण  हा पदार्थ मेंदूला पोहोचणारे भूकेबाबतचे संकेत रोखतो यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

६) कार्बोनाइड ब्रेड आणि ब्रेडसारख्या इतर उत्पादनांमध्ये एजोडीकार्बोनामाइड या पदार्थांचा वापर केला जातो.  पीठ जास्त पांढरे आणि लवचीक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. अभ्यासानुसार हा घटक  उंदरांमध्ये फुफ्फुसं आणि ब्लड कॅन्सरचं कारण ठरला आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सकर्करोग