Join us   

पोटॅशियम-आयर्नचा खजिना आहेत ४ पदार्थ; रोज खाल्ले तर रक्त वाढेल-अंगदुखीचा त्रास होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 9:25 PM

List Of Potassium Rich Foods : हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि हाडं चांगली राहण्यासाठी पोटॅशिमयची आवश्यकता असते.

शरीरात व्हिटामीन्स प्रोटीन्सबरोबर अनेक खनिज पदार्थांची आवश्यकता असते. पोटॅशियम असा पदार्थ आहे जो शरीरातील अनेक प्रक्रियांमध्ये वापरला जातो.  यात अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीर व्यवस्थित उत्पादन करत नाही. यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. पोटॅशियमसुद्धा रोजच्या आहारातून मिळते. (List Of Potassium Rich Foods That Are beneficial For Heart Health And Control High)

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि हाडं  चांगली राहण्यासाठी पोटॅशिमयची आवश्यकता असते.  ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी पोटॅशियमचे सेवन करायला हवे ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका टाळता येतो.

पोटॅशियम एक इलेक्ट्रोलाईटच्या स्वरूपात कार्य करते. ज्यामुळे मांसपेशी मजबूत बनतात आणि हृदयाचे ठोके सामान्य राहतात. आपल्या  रोजच्या  आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.  ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. काही खाद्यपदार्थांचे नियमित सेवन करायला हवे. या खाद्यपदार्थांच्या सेवनानं शरीरातील पोटॅशियमचची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते

 

अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या रिपोर्टनुसार पालकात एंटीऑक्सिडेंट्स, फ्लेवोनॉइड्स असतात. ज्यामुळे  सेल  डॅमेज होण्यापासून बाचवता येते. एक कप टोमॅटो सूपमध्ये ७२८ मिलीग्राम पोटॅशियम असते. टोमॅटोचे सेवन केल्यानं शरीराची सूज  कमी होण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या जसं की पालक खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. शिजवलेल्या पालकात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे डोळे चांगले राहतात. इम्यून सिस्टीम चांगली राहते आणि हाडांचे आरोग्यही चांगले राहते. 

नारळाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते हे स्वादीष्ट तितकेच पौष्टीकही असते. यात इलेक्ट्रोलाईट्सचचे अधिक प्रमाण असते.  हे पाणी प्यायल्यानं पीएच संतुलन चांगले राहते. मांसपेशी हृदयाच्या उत्तम कार्यासाठी फायदेशीर ठरतात. एक कप नारळाच्या पाण्यात जवळपास ६०० मिलीग्राम पोटॅशियम असते. यामुळे थकवा कमकुवतपणा उद्भवत नाही नारळाच्या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते.  ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. 

 

एक कप दह्यात ३८० मिलीग्राम पोटॅशियम असते. यातील प्रोबायोटीक्स गुणांमुळे दह्याचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी दही उत्तम ठरते. यातील बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दही खाल्ल्यानं भूक कमी लागते आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून जास्त साखरयुक्त दही खाणं टाळायला हवं. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स