Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बायकोचं ऐका, हार्ट ॲटॅक येणार नाही; संशोधनच सांगते-बायकोचं ऐकणाऱ्यांना ॲटॅकचा धोका कमी

बायकोचं ऐका, हार्ट ॲटॅक येणार नाही; संशोधनच सांगते-बायकोचं ऐकणाऱ्यांना ॲटॅकचा धोका कमी

Research Listen To Your Wife To Lower Heart Attack Risk : कॅलिफोर्नियातील व्हि.ए ग्रेटर लॉस एंजेलिस हेल्थकेअर सिस्टीममधील तज्ज्ञ नटारीया जोसेफ म्हणतात, पार्टनर्समधील अधिक नकारात्मक कायमच त्रासदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:36 PM2024-10-09T12:36:49+5:302024-10-09T12:56:52+5:30

Research Listen To Your Wife To Lower Heart Attack Risk : कॅलिफोर्नियातील व्हि.ए ग्रेटर लॉस एंजेलिस हेल्थकेअर सिस्टीममधील तज्ज्ञ नटारीया जोसेफ म्हणतात, पार्टनर्समधील अधिक नकारात्मक कायमच त्रासदायक

Listen To Your Wife To Lower Heart Attack Risk Listen To Your Wife More To Lower Your Chances Of Heart Disease | बायकोचं ऐका, हार्ट ॲटॅक येणार नाही; संशोधनच सांगते-बायकोचं ऐकणाऱ्यांना ॲटॅकचा धोका कमी

बायकोचं ऐका, हार्ट ॲटॅक येणार नाही; संशोधनच सांगते-बायकोचं ऐकणाऱ्यांना ॲटॅकचा धोका कमी

नवरा बायकोच्या नात्यात वाद होणं काही  नवीन नाही. प्रत्येक कपल्समध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून नेहमीच मतभेद होत असतात. पार्टनरनं आपलं म्हणणं ऐकावं असं अनेकांना वाटतं.  ज्या घरात पत्नीचं सर्वाधिक ऐकलं जातं तिथे शांतता असते आणि घरातील मंडळीही आनंदी असतात असं म्हटलं जातं. पण काहीजण पत्नीचं म्हणणं न ऐकता स्वत:ला जे योग्य वाटतं तेच करतात आणि पत्नीच्या मताला किंमत देत नाहीत. (Heart Attack Reasons) ज्या घरात पत्नीच्या मताला महत्व दिले जात नाही तिथे अशांतता, ताण-तणाव अशी स्थितीत उद्भवते. (Listen To Your Wife To Lower Heart Attack Risk Research)

रिसर्च काय सांगतो?

२०१४ मध्ये २८१ लोकांवर या संदर्भात अभ्यास करण्यात आला होता.सध्या हार्ट ॲटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. खासकरून  महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हार्ट ॲटॅकचा धोका  जास्त असतो. समोर आलेल्या संशोधनानुसार पत्नीचं  ऐकणाऱ्या पुरूषांमध्ये हार्ट ॲटॅकचा धोका कमी असतो. या संशोधनातून दिसून आले की परस्पर संवाद भावना, आरोग्य वर्तवणूक याचा आरोग्यावर परिणाम होतो (Ref). पती पत्नीच्या संवादाचा परिणाम आरोग्यावर होतो. पत्नीसोबत जर सकारात्मक संवाद असेल तर ते हृदयासाठी चांगले असते. अशा पुरूषांमध्ये हार्ट ॲटॅकचा धोका कमी असतो. संशोधक जोसेफ यांनी या अभ्यासात कॅरोडीट धमन्यांमधील परस्पर संबंध आणि त्याचा प्रभाव लाईव्ह सायन्सच्या अहवालात नोंदवला आहे.

१ महिना रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? पोषणतज्ज्ञ सांगतात रात्री न जेवल्याचे परिणाम

कॅलिफोर्नियातील व्हि.ए ग्रेटर लॉस एंजेलिस हेल्थकेअर सिस्टीममधील तज्ज्ञ नटारीया जोसेफ म्हणतात, पार्टनर्समधील अधिक नकारात्मक संवादाचा रक्तदाबावर परिणाम होतो.  हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या, स्ट्रेस, नकारात्मकता आणि जीवनशैलीचे ताण याच्याशीही संबंधित असतात.

जेव्हाही तुम्ही ऑफिसमधून थकून घरी येता तेव्हा हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी  पत्नीशी बोलायला वेळ काढा. नवीन संशोधन सांगते, तुमच्या जोडीदाराशी असलेल्या सकारात्मक संवादामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो.  

Read in English

Web Title: Listen To Your Wife To Lower Heart Attack Risk Listen To Your Wife More To Lower Your Chances Of Heart Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.