Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोपताना इयरफोन लावून गाणी ऐकणं धोक्याचं! ३ दुष्परिणाम, झोपेचंही होतं खोबरं..

झोपताना इयरफोन लावून गाणी ऐकणं धोक्याचं! ३ दुष्परिणाम, झोपेचंही होतं खोबरं..

Ear Phone Problems रात्री झोपताना शांत मंद संगीत ऐकणं उत्तम, पण मोबाइलवर गाणी ऐकणं मात्र डोक्याला ताप होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 04:40 PM2022-12-02T16:40:14+5:302022-12-02T16:42:00+5:30

Ear Phone Problems रात्री झोपताना शांत मंद संगीत ऐकणं उत्तम, पण मोबाइलवर गाणी ऐकणं मात्र डोक्याला ताप होऊ शकतो.

Listening to songs with earphones while sleeping is dangerous! 3 side effects, sleep is also bad.. | झोपताना इयरफोन लावून गाणी ऐकणं धोक्याचं! ३ दुष्परिणाम, झोपेचंही होतं खोबरं..

झोपताना इयरफोन लावून गाणी ऐकणं धोक्याचं! ३ दुष्परिणाम, झोपेचंही होतं खोबरं..

संगीत ही फक्त आवड नसून एक थेरपी आहे. प्रत्येकाला विशिष्ट गाण्याची ओढ असते. कोणत्या न कोणत्या गाण्याला ते स्वतःचं आयुष्य जोडून घेतात. आपला वेळ छान जावा यासाठी  गाण्याची निवड करतात. परंतु, अनेकांना प्रवासात अथवा झोपताना रात्री गाणी ऐकण्याची सवय असते. मात्र कानाला इयरफोन लावून झोपणे हे काही आरोग्यासाठी बरे नाही.

इयरफोन लावून संगीत ऐकणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. जास्त वेळ गाणी ऐकणे आपल्या कान आणि झोपेच्या चक्रात अडथळा आणते. आपल्या शरीरात सर्कॅडियन रिदम नावाचे अंतर्गत घड्याळ असते. सर्कॅडियन रिदम हे एका शरीर घड्याळासारखे काम करते, जे आपल्या झोपेचा आणि जागे होण्याच्या वेळेचा मागोवा ठेवते.
चांगली सर्केडियन रिदम आपल्या मेंदूला दिवसभर सतर्क राहण्यास मदत करते, ज्यामुळे आपण दिवसभर चांगले कार्य करू शकतो. पण, जेव्हा आपण शरीराला या रिदमऐवजी दुसऱ्या आवाजावर अवलंबून ठेवतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या शरीरासाठी हानिकारक कारण बनते.

झोपताना का ऐकू नये गाणी ?

१. खरंतर आपण गाणी ऐकतो तेव्हा आपला मोबाईल फोनही आपल्या आजूबाजूला असतो. अनेक वेळा आपण गाणी बदलतो ज्यामुळे आपले शरीर सक्रिय मोडमध्ये राहते, त्याला विश्रांती मिळत नाही. झोप योग्य प्रकारे पूर्ण होत नाही आणि ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. झोपताना हाय व्हॉल्यूममध्ये गाणी ऐकू नये अन्यथा, शरीरावर अधिक घातक परिणाम होऊ शकतात.

२. गाणे ऐकून चांगली झोप येत असेल तर इअरफोन्स ऐवजी सामान्य पद्धतीने गाणे ऐका. कारण गाणी ऐकणे ही सवयी बनलेली असते. त्यामुळे फोन बेडपासून दूर ठेवा आणि गाण्यांचा आवाज कमी ठेवा. जेणेकरून तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपण्याच्या पद्धतीवर परिणाम होणार नाही.

Web Title: Listening to songs with earphones while sleeping is dangerous! 3 side effects, sleep is also bad..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.