Join us   

Live longer secret six : फक्त ६ गोष्टी वाढवतील तुमचं आयुष्य; तज्ज्ञांनी सांगितलं निरोगी दीर्घायुष्याचं सोपं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 3:01 PM

Live longer secret six : हसल्यानं आपलं मन आणि शरीर दोन्ही चांगले राहतात.  कोर्टिसोल आणि एंड्रोफिन्ससारखे हॉर्मोन्स लिलीज झाल्यानंतर इम्यून सिस्टीम आणि ब्लड प्रेशर सुरळीत राहतं.

चांगली झोप, चांगलं खाणं पिणं, नियमित व्यायाम आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. पण एकमेकांशी प्रेमानं वागणंसुद्धा  चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. (How to live longer) कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सर्टिफाईट मनोचिकित्सक डॉय कैली हार्डींग यांच्यामते चांगले व्यक्तीमत्व आणि एकमेंकाप्रती प्रेमपूर्वक व्यवहार केल्यानं  हॅप्पी हॉर्मोन्स प्रभावित होतात त्यामुळे माणसाचं आयुष्य जवळपास ७ वर्षांनी वाढू शकतं.  (Live longer secret six ways to add seven years more in your life)

द रॅबिट इफेक्टमध्ये हार्डिंगनं हा दावा केला आहे की माणसाचा दयाळूपणा त्याचा इम्यून सिस्टिम आणि ब्लड प्रेशरवर चांगला परिणाम होतो. परिणामी लोक एका चांगल्या आणि दीर्घ आयुष्याचा आनंद घेऊ सकतात. (Simple Steps to Increase Your Life Expectancy) जेम्स एलिस न्युट्रिशन च्या कोच जेम्स एलिस यांचेही असेच म्हणणे आहे. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, चांगलं वागल्यानंतर ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळे दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते.  या रिपोर्टमध्ये माणसांचे वय वाढण्याचे अनेक सिकेट्स सांगितले आहेत. (Live longer secret six)

...म्हणून ऐन तरूण्यात पुरूषांना येतं वंध्यत्व; स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी काय खायचं काय टाळायचं, वाचा

चांगले मित्र 

चांगले मित्र आरोग्यासाठी चांगले असल्याचं अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. कारण चांगलं नातं आणि सपोर्ट माणसाची जिवंत राहण्याची संभावना वाढवतात. कारण फक्त आनंदातच नाही  तर दु:खाच्या काळातही चांगले मित्र साथ सोडत नाहीत यामुळे कौटुंबिक समस्या किंवा गंभीर आजारांमुळे येणारा तणाव कमी होण्यास मदत होते.

चांगलं वागणं

अमेरिकन वैज्ञानिकांना आढळलं की,  इतरांची मदत केल्यानं आणि वेळ दिल्यानं आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. २०१३ ला ८४६ लोकांवर केलेल्या अभ्यासाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 

भरपूर हसा

हसल्यानं आपलं मन आणि शरीर दोन्ही चांगले राहतात.  कोर्टिसोल आणि एंड्रोफिन्ससारखे हॉर्मोन्स लिलीज झाल्यानंतर इम्यून सिस्टीम आणि ब्लड प्रेशर सुरळीत राहतं. २०१० मध्ये मिशगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार खूप हसणारे लोक साधारण ७९.९ वर्ष जगतात. जर  यापेक्षा कमी हसणारे लोक ७५ वर्ष जगतात. जराही न हसणारे लोक सगळ्यात कमी म्हणजेच ७२.९ वर्ष जगतात.

उन्हाळ्यात रोजच्या जेवणातील ४ पदार्थांमुळे होऊ शकतं फूड पॉयझनिंग, सावधान..

या ३ गोष्टी लक्षात ठेवा

इतरांची मदत करत राहा. 

स्वत:वर प्रेम करा

ऐकण्याची क्षमता वाढवा.

बॉस्टन स्कूल ऑफ मेडिसिनद्वारे सन २०१९ मध्ये एक अभ्यास दिसून आला त्यात दिसून आलं की एक पॉजिटिव्ह मेंटल एटिट्यूड आपले जीवनमान ११ ते १५ टक्क्यांनी वाढू शकतो.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य