Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स

लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स

Liver Detox Tips : लिव्हर स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानं, त्रिफळा  आणि मेथीच्या बियांचे सेवन करायला हवे. यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:46 AM2023-09-04T08:46:00+5:302023-09-04T15:11:24+5:30

Liver Detox Tips : लिव्हर स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानं, त्रिफळा  आणि मेथीच्या बियांचे सेवन करायला हवे. यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

Liver Detox Tips : Ayurveda experts told 6 best ayurvedic remedies for liver cleansing | लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स

लिव्हर ठणठणीत ठेवायचं तर आहारात हवेत ६ पदार्थ, रोज खा -लिव्हर करा डिटॉक्स

लिव्हर शरीर निरोगी ठेवण्यासाठी फार महत्वाचं असतं. लिव्हरचं कार्य शरीरातील अमिनो एसिड्सच रेग्युलेट करणं असते.  यामुळे ग्लुकोज लेव्हल बॅलेंज राहते, ग्लुकोजला ग्लायकोजनमध्ये कर्नव्हर्ट करणं, ब्लड क्लॉट होऊ न देणं, इन्फेक्शनशी लढून रोगप्रतिकारकशक्ती मजबूत बनणं, ही लिव्हरची कामं आहेत. (Liver Detox Tips)

लिव्हर खराब झाल्यास थकवा, पोटदुखी,  काविळ, ब्लिडींग,  किडनी खराब होणं, मल-लघवीचा रंग बदलणं, उलट्या होणं, पचनक्रिया बिघडणं अशा गंभीर समस्या उद्भवतात.  तुम्ही दिवसभरात जे काही खाता पिता त्यातीली विषारी पदार्थ लिव्हरमध्ये जमा होत असतात. म्हणूनच लिव्हर डिटॉक्स होणं फार महत्वाचं असतं. डॉ. कपिल त्यागी यांनी लिव्हरच्या स्वच्छेसाठी काही आयुर्वेदीक उपाय सुचवले आहेत. (Ayurveda experts told 6  best ayurvedic remedies for liver cleansing)

त्रिफळा आणि मेथीच्या बीया

लिव्हर स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानं, त्रिफळा  आणि मेथीच्या बियांचे सेवन करायला हवे. यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

आहार

आयुर्वेदीक पद्धतीनुसार आहार घेतल्यास लिव्हरचे आरोग्य सुधारते. यात कारलं, पालक यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे.  हे पदार्थ खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते. 

तुम्ही रोज सकाळी नाश्ता किती वाजता करता? लक्षात ठेवा नाश्त्याचा १ गोल्डन रुल

आयुर्वेदीक औषधी

आयुर्वेदात अनेक जडी-बुटींचा वापर लिव्हरचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. भूम्यामलाकी, अर्जुन आणि कुटकी यांचा समावेश आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन या औषधांचे सेवन करा.

हर्बल टी

हर्बल चहा लिव्हरच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. काही आयुर्वेदीक हर्ब्स जसं की त्रिफळा, कटुकी यांचे चहाच्या स्वरूपात सेवन करा. जेणेकरून लिव्हरमधून विषारी पदार्थ बाहेर पडतील.

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांद्यात अनेक आयुर्वेदीक औषधी गुण आहेत. ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते.  तुम्ही रोजच्या आहारात कांदा लसणाचा समावेश करू शकता. यामुळे लिव्हर निरोगी आणि मजबूत राहतं. ताण-तणाव कमी होतो आणि पचनक्रिया चांगली राहते. 

पिरिएड्समध्ये २ च दिवस अंगावरून जातं? नियमित ४ दिवसांची पाळी येण्यासाठी डॉक्टर सांगतात....

पंचकर्म

आयुर्वेदीक चिकित्सेत पंचकर्माचे मोठे स्थान आहे. यामुळे लिव्हर शुद्ध आणि निरोगी राहते. यात मसाज, स्नान, विरेचन, रक्त शुद्धी या प्रक्रियांचा समावेश आहे.
 

Web Title: Liver Detox Tips : Ayurveda experts told 6 best ayurvedic remedies for liver cleansing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.