Liver Health : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल लिव्हरसंबंधी समस्यांचे अनेक लोक शिकार होत आहेत. जर वेळीच लिव्हरसंबंधी आजारांची लक्षणं ओळखून त्यावर उपचार केले नाही तर लिव्हर फेल होण्याचा धोका अधिक वाढतो. अनेक लोक लिव्हरसंबंधी आजारांच्या लक्षणांना सामान्य समजून लोक त्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मग नंतर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे लिव्हरमध्ये काही गडबड असल्यावर शरीरात काय लक्षणं दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून वेळीच तुम्ही योग्य ते पाउल उचलू शकाल.
पोट जड वाटणं
पोटाच्या वरच्या भागात जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त जडपणा वाटत असेल, गॅस किंवा सूज वाटत असेल तर हा फॅटी लिव्हरचा संकेत असू शकतो. तु्म्हाला हेही माहीत असलं पाहिजे की, लिव्हरसंबंधी समस्यांमुळे गट हेल्थवर सुद्धा वाईट प्रभाव पडतो.
त्वचा पिवळी दिसणं
जर डोळे पिवळे झाले असतील किंवा त्वचेवर पिवळेपणा दिसत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. त्वचेवर खूप जास्त दिवस खाज येणे किंवा त्वचेवर पुरळ येणे ही लिव्हर डॅमेज होत असल्याची लक्षणं असू शकतात. अशात जराही वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांना दाखवा.
उलटी किंवा अस्वस्थ वाटणं
जर तुमच्या लिव्हरमध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा उलटीची समस्या होऊ शकते. तसेच तुम्हाला अस्वस्थही वाटू शकतं. त्यामुळे या लक्षणांना सामान्य समजून याकडे दु्र्लक्ष करणं महागात पडू शकतं.
सतत थकवा आणि कमजोरी
जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर याचं कारण तुमचं लिव्हर व्यवस्थित काम न करणं. लिव्हरमध्ये काही गडबड असेल तर पूर्ण आरोग्यावर याचा वाईट प्रभाव पडतो आणि वेगवेगळ्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा.