Join us   

लिव्हर सांभाळा, भूक कमी होणे - लघवीचा रंग बदलणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 5:41 PM

Liver problems - Symptoms and causes : लिव्हर खराब होण्याची ९ प्रमुख लक्षणे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, आरोग्याची काळजी घ्या

मानवी शरीर अनेक अवयवांनी तयार झाले आहे. एखाद्या व्यक्तीच्या निरोगी आरोग्यासाठी, त्याच्या सर्व अवयवांचे कार्य योग्यरित्या चालू राहणे गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचा एक जरी भाग खराब झाला तरी, हळूहळू इतर अवयव देखील खराब होऊ लागतात. वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू होण्याचा देखील धोका वाढतो. आपल्या शरीरात असे अनेक अवयव आहेत, ज्यांच्या नुकसानामुळे अल्पावधीतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यात यकृताचा देखील समावेश आहे.

यकृत हा आपल्या शरीराचा दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. यकृत एकाच वेळी अनेक कार्ये करते. त्याचे मुख्य कार्य म्हणजे अन्न आणि पेयाचे  ऊर्जा आणि पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करणे. याशिवाय ते रक्तातील हानिकारक आणि विषारी पदार्थ फिल्टर करून वेगळे करते. परंतु, यकृत खराब कशामुळे होते? यकृत खराब होण्याआधी कोणते संकेत देते?(Liver problems - Symptoms and causes).

नकळत वाढेल बीपीचा त्रास, वेळीच फॉलो करा ५ घरगुती सोपे उपाय, ब्लड प्रेशर होईल नॉर्मल

यकृत अनेक कारणांमुळे खराब होऊ शकते. विषाणूजन्य हिपॅटायटीस, सिरोसिस, अल्कोहोल, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, या  कारणांमुळे यकृत खराब होऊ शकते. यकृत खराब झाल्यावर रुग्णाला काही दिवसात विशेष लक्षणे जाणवू लागतात. तर काहींचे यकृत हळूहळू खराब होते. अशा वेळी अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनीही रुग्णाला याची जाणीव होते.

मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

लिव्हर खराब होण्याची ९ लक्षणे

मायउपचार. कॉम या वेबसाईटनुसार, 'यकृताच्या खराब होण्याच्या लक्षणांमध्ये उलट्या येणे, भूक कमी लागणे, थकवा, जुलाब, कावीळ, सतत वजन कमी होणे, स्किनवर खाज सुटणे, सूज येणे व लघवीचा रंग बदलणे इत्यादी लक्षणे निदर्शनास येतात. लिव्हरची काळजी घ्यायची असेल तर, अल्कोहोलचे अतिसेवन टाळले पाहिजे. याशिवाय तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाऊ नयेत. यासह वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.'

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य