Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात..

एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात..

Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack : अजिबात होऊ नका एकटेपणाचा शिकार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 18:43 IST2025-01-31T18:41:15+5:302025-01-31T18:43:31+5:30

Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack : अजिबात होऊ नका एकटेपणाचा शिकार.

Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack | एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात..

एकटेपणा करतोय काळीज कमकुवत, हार्ट अटॅकचा वाढतो धोका, डॉक्टर सांगतात..

आजकालच्या मुलांना एकलकोंडं राहायला आवडते. इन्ट्रोव्हर्ट लोकांची संख्या वाढत चालली आहे. इन्ट्रोव्हर्ट म्हणजे ज्याला लोकांशी बोलायला आवडत नाही. जो समाजातील इतर लोकांशी जाऊन मिसळत नाही.(Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack) त्याचा त्याचाच राहतो. थोड्या थोडक्या लोकांशी कामापूरतं बोलतो. हा कोणता आजार नाही. इन्ट्रोव्हर्ट माणसं त्यांच्या मर्जीने असं वागतात. (Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack) त्यांना बोलता येत नाही वगैरे असं काही नाही. त्यांना बोलण्यात रूची नसते. आजकाल तंत्रज्ञानही फार पुढे गेले आहे. अशा लोकांना एकट्याला कंटाळा येत नाही. ते मोबाइल, संगणक, आदींचा वापर करतात. ज्यांना वाचनाची आवड असते ते पुस्तके वाचतात. तरी काही जणांना समाजाशी संबंध ठेवायचे असूनही जमत नाही. कसली तरी सतत भीती त्यांना वाटतं राहते.

डॉ. चिती पारिख म्हणतात, सध्या सगळीकडे खासकरून युएसमध्ये हृदयाचे विकार होण्यामागे मुख्य कारण लोनलीनेस आहे. अयोग्य आहार हे एक कारण झालं. (Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack)पण एकलकोंडेपण  वेगवेगळ्या विकारांना कारणीभूत आहे. आम्ही डॉक्टर आहोत औषध देतोच पण जर तुमच्या आजाराचे कारण मानसिक आहे तर तो कसा बरा करायचा? आत्ताची पिढी होकअप कल्चरकडे वळली आहे. एकटेपणा घालवण्याचा तो योग्य मार्ग त्यांना वाटतो. पण तस नसून अजून त्रास होतो.

एकटेपणामुळे आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. स्वत:ला आपण कमी समजायला लागतो. मनात साठलेल्या या विचारांचा हृदयावर परिणाम होतो. हृदय दबावा खाली येते. मग यातूनच हृदय विकाराचा झटका येतो. हेच जर आपल्याशी बोलायला कोणी असेल. जर कोणासमोर आपण मन मोकळं केलं की ताण येत नाही. आपलं ओव्हरथिंकींग कमी होतं. माणूस हा शेवटी सामाजिक प्राणी आहे. काहीही झालं तरी शेवटी आपल्याला लोकांशी बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जर एकलकोंडे आहात तर सतं राहू नका. कुटुंबियांशी बोला. मित्रमैत्रीणींशी बोला. मन हलकं ठेवा.     

Web Title: Loneliness weakens the heart, increases the risk of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.