Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Long Life Foods :  १०० वर्षांपेक्षा जास्त निरोगी दीर्घायुष्य हवंय? मग आजचं 'हे' पदार्थ खायला लागा, वैज्ञानिकांचा दावा

Long Life Foods :  १०० वर्षांपेक्षा जास्त निरोगी दीर्घायुष्य हवंय? मग आजचं 'हे' पदार्थ खायला लागा, वैज्ञानिकांचा दावा

Long Life Foods : जर तुम्ही आहारात सहज उपलब्ध होत असलेल्या काही हेल्दी पर्यांयांची निवड केली तर नक्कीच दीर्घायुष्य मिळण्यास मदत होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:48 AM2021-11-14T11:48:05+5:302021-11-14T11:57:34+5:30

Long Life Foods : जर तुम्ही आहारात सहज उपलब्ध होत असलेल्या काही हेल्दी पर्यांयांची निवड केली तर नक्कीच दीर्घायुष्य मिळण्यास मदत होऊ शकते.

Long Life Foods :  Long life foods 5 best foods which increase your life expectancy over 100 years | Long Life Foods :  १०० वर्षांपेक्षा जास्त निरोगी दीर्घायुष्य हवंय? मग आजचं 'हे' पदार्थ खायला लागा, वैज्ञानिकांचा दावा

Long Life Foods :  १०० वर्षांपेक्षा जास्त निरोगी दीर्घायुष्य हवंय? मग आजचं 'हे' पदार्थ खायला लागा, वैज्ञानिकांचा दावा

आपण निरोगी आणि जास्त दिवस जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. ( How to live longer) पण खराब जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांना जगाचा निरोप घ्यावा लागतो. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम झाल्यानं जीवनमानावर प्रभाव पडतो. खासकरून घरोघरच्या महिला कामाच्या नादात आपल्या खाण्यापिण्याकडे आणि खाण्यापिण्याच्या वेळांकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. अशा स्थितीत जर  तुम्ही आहारात सहज उपलब्ध होत असलेल्या काही हेल्दी पर्यांयांची निवड केली तर नक्कीच दीर्घायुष्य मिळण्यास मदत होऊ शकते. (Long Life Foods )

आपल्या आहारात चांगल्या पौष्टीक पदार्थांचा समावेश केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वैज्ञानिक आणि हेल्थ एंड न्युट्रिशन्स एक्सपर्ट्स डॉ. जेम्स डिनिकोलांटिया यांनी अलिकडेच आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून आहाराबाबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार असा आहार घेतल्यानं  १०० वर्षांपर्यंत दिर्घायुष्य मिळू शकतं.  (How to stay healthy and fit)

कच्च मध

मधात अनेक पोषक तत्व असतात त्यामुळे कॅन्सर आणि हृदयाशी जोडलेल्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. नॅशनल लायब्रेरी ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार लिव्हर, कोलोरेक्टल आणि ब्रेस्ट कॅन्सरवर मध प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. अभ्यासानुसार मध ट्यूमर आणि कॅन्सरच्या पेशींवर सायटोटॉक्सिक आहे तर सामान्य पेशींसाठी नॉन सायटोटॉक्सिक आहे.

बकरीच्या दुधाचा खवा (केफिर)

कॅन्सरमुळे संपूर्ण जगभरात मृत्यूचा धोका वाढत आहे. बकरीच्या दुधात असलेले प्रोबायोटिक्स आपल्या इम्यून सिस्टिमला दुरूस्त करून कॅन्सरचे ट्यूमर वाढण्यापासून रोखतात. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.  जर्नल ऑफ मेडिसिन फूडमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार याचे सेवन शरीरात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका  ५६ टक्क्यांनी कमी करते.

डाळिंब

डाळिंबात व्हिटामीन  ए, सी, ई आणि अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय त्यात अनेक एंटी व्हायरल आणि एंटी ट्यूमरल गुणधर्म आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार  डाळिंबातील मायटोकांड्रिया मांसपेशींना कमकुवत होण्यापासून रोखते.  अन्य अभ्यासानुसार मायटोकांड्रियाचे डिसफंक्शन पार्किंसन्ससारख्या एजिंग डिसीजना ट्रिगर करण्याचे काम करते. 

कच्च केळं

कच्च म्हणजेच हिरव्या केळ्यात प्रीबायोटिक्स असतात. आपल्या पोटातील हेल्दी बॅक्टेरियांसाठी हे फायदेशीर ठरातत.  यामुळे रक्तदाबही नियंत्रणात  राहतो. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की हिरवं केळं खाल्ल्यानं किडनी कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

फर्मेंटेड फूड्स

फर्मेंटेड फूड आपल्या मेटबॉलिक रेटला बदलू शकते. याचा अर्थ असा की यामुळे आपली पचनक्रिया सुधारू  शकते. यातील प्रोबायोटिक्स, एंटीऑक्सिडेंट्स आणि एंटीमायक्रोबियल गुणधर्म एजिंग आणि  दीर्घायुष्यातील जोखिम कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त बेरिज, मशरूम, साल्मन फिश आणि अंडी खाल्ल्यानंसुद्धा तब्येत चांगली राहण्यास मदत होते. 

Web Title: Long Life Foods :  Long life foods 5 best foods which increase your life expectancy over 100 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.