युकेतील सीबीडी कंपनी ईडन गेटनं जगभरातील वयस्कर लोकांवर केलेल्या अभ्यासातून त्यांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट माहित करून घेतलं आहे. (Long Life Secret) तब्येत आणि दीर्घायुष्यावर अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी १०० वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या ६ लोकांवर रिसर्च केला. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यामागे मुव्हमेंटस, सोशियो इकोनोमिक स्टेटस, स्ट्रेस लेव्हल आणि डाएटचा समावेश होता. डाएट हा असा फॅक्टर आहे. ज्यावर लोकांनी नियंत्रण ठेवले होते. (How to live long world oldest person ate these three things every day long life secret over 100 years)
विज्ञानानुसार जगभरात अशा अनेक गोष्टी प्रचलित आहेत. ज्या माणसाला दीर्घायुष्य येऊ शकतात. जसं की बदाम, बेरीज किंवा मासे खाल्ल्यानं शरीराला न्यूट्रिशन्स मिळतात त्यामुळे शरीरात बदल होतो. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. या अभ्यासात १२२ वर्षांच्या जीन लुईस कालमेंट यांचा आहारही पाहण्यात आला. ज्या जगातल्या सगळ्यात जास्त जगलेल्या व्यक्ती होत्या. १९९७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
ऑलिव्ह ऑईल
संशोधकांनी लुईस कालमेंटच्या यांच्या आहारात ३ वस्तू असल्याचं पाहिलं. ज्याचं पहिलं सिक्रेट होतं ऑलिव्ह ऑईल. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार ऑलिव्ह ऑईलमधील हेल्दी फॅट्स, एंटी ऑक्सिडंट्स आणि एंटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज हार्ट डिसिस आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात.
नेहमी फोडणीचा भात कशाला, उरलेल्या भातापासून बनवा कुरकुरीत डोसा; ही घ्या सोपी रेसेपी
रेड वाईन
कालमेंटच्या डाएटचं दुसरं सिक्रेट होतं रेड वाईन. मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार रेड वाईनमध्ये एंटी ऑक्सिडंट्स आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच तज्ज्ञ नियमित स्वरूपात रेड वाईनचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
चॉकलेट
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनमुसार आणि कालमेंट डाएट आणि हॉपकिन्स मेडिसिन्सननुसार चॉकलेटच्या सेवनानं आयुष्य वाढतं. चॉकलेटमध्ये हृदय निरोगी ठेवणारे गुण असतात त्यामुळे इम्यून सिस्टिम चांगली राहते. चॉकलेटमध्ये सपोर्टिंग सक्युलेशन आणि ब्रेन फंक्शन बुस्ट करणारे गुणधर्म असतात. यामुळे एथलेटीक फरफॉर्मेस सुधारण्यास मदत होते. या पदार्थांचा नियमित डाएटमध्ये समावेश केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते.