Join us   

दिवसाचे १० तास स्क्रीन पाहता, सायबर सिकनेस तर झाला नाही ना, जाणून घ्या लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 6:33 PM

Cyber Sickness जर आपण लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्हीवर तासंतास घालवत असाल, तर वेळीच सावध व्हा. डोळ्यांची काळजी घेणं महत्त्वाचं..

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण टेक्नॉलॉजीच्या अधीन होत चालली आहे. कित्येकांना लॅपटॉप अथवा मोबाईल फोन शिवाय करमतच नाही. कोरोना या वैश्विक महामारीनंतर ऑनलाईन क्लास, आणि कामामुळे लोकांना मोबाईल फोन - लॅपटॉपची सवयी लागली आहे. प्रत्येक गोष्टींसाठी आजकालच्या पिढीला फोन लागतोच. मात्र, अतिवापर देखील आपल्या शरीरासाठी चांगले नाही.

स्क्रीनला जास्त वेळ चिटकुन राहिल्याने डोळे दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे अशा तक्रारी उद्भवतात. स्क्रीनकडे पाहताच डोळे सुयासारखे टोचू लागतात. पापण्यांवर दाब पडतो, डोकेदुखी यांसारख्या समस्या त्रास देतात. हा प्रकार कोणत्याही वयोगटातील लोकांसोबत होऊ शकतो. याला सायबर सिकनेस हा आजार म्हणतात.

सायबर सिकनेस रोगाची लक्षणे

- डोळ्यात सुया सारखे टोचणे

- डोळे लाल होणे

- पापण्यांवर दबाव जाणवणे

- तीव्र डोकेदुखी

- डोळ्यांना सूज येणे

- चक्कर येणे

- मळमळ होणे

- चिडचिड

- झोपायला त्रास

लक्षणांपासून कसे वाचाल

डोळे बंद करून तीन वेळा डोळ्यांचा व्यायाम करा, नंतर उजवीकडे डावीकडे डोळे हलवा आणि शेवटी जमिनीकडे पहा. याने डोळ्यांना आराम मिळेल.

आपण स्क्रीनचा अधिक वापर करत असाल, तर तो कमी करा. एका दिवसात, आपण स्क्रीन टाईमिंग किमान ३० टक्क्याने कमी केला पाहिजे.

जर आपण 7 ते 8 तास स्क्रीनवर काम करत असाल, याव्यतिरिक्त टीव्ही आणि मोबाईलवर २ तास, म्हणजेच एकूण 10 तास घालवत असाल, तर ते आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकते.

रात्री मोबाइल वापरणे टाळा, विशेषतः झोपताना मोबाइलकडे पाहू नका. याने डोळ्यांना आणखी इजा होऊ शकते.

डोळ्यांना अधिक त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक