Join us   

प्रवासात खूप उलट्या होतात, डोकं दुखतं? हे घ्या गाडी लागण्यावर 5 घरगुती उपाय, करा प्रवास आनंदात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 6:23 PM

प्रवासात कशामुळे होते उलटी आणि त्यावर कोणते उपाय केल्यास फायदा होतो वाचा

ठळक मुद्दे प्रवासात उलटीने वैतागत असाल तर हे उपाय करुन पाहाउलटीच्या त्रासाला कंटाळून प्रवास टाळताय? असे करुन नका

थंडीच्या दिवसांत दिवाळी, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्टीत फिरायला जायचे प्लॅनस होतात. थंडीच्या दिवसांत कधी कोणाचे लग्न म्हणून प्रवास करावा लागतो तर कधी देवदर्शनाला जाण्याचे नियोजन होते. पण कार, बस यामध्ये नेहमी डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होणारे लोक कुटुंबिय किंवा मित्रमंडळींसोबत कुठेही जाणे टाळतात. गेलेच तर हे लोक स्वत: आणि त्यांच्याबरोबरचे इतर लोकही या व्यकला सतत उलटी होत असल्यामुळे काहीसे वैतागतात. आता अशाप्रकारे उलटी आणि मळमळीचा त्रास होणारे कोणी ना कोणी असतेच. 

हा त्रास कशामुळे होतो याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. हा त्रास कधी अनुवंशिक आहे असे म्हटले जाते. तर प्रवासात उलटी होणे मानसिक आहे असे म्हणून काही जण याची चेष्टाही करताना दिसतात. पण याचे शास्त्रीय कारण म्हणजे कानाच्या आतल्या बाजूला एक व्हेस्क्युलर सिस्टिम असते. म्हणजे या सिस्टिमच्या एका भागात लिक्विड असतं आणि दुसऱ्या भागात थोडेसे केस असतात. जेव्हा हालचाल होते तेव्हा लिक्विड हलतं आणि केसांवर आदळून केसांची पण हालचाल होते. ह्या वरून मेंदूला हालचाल होत असल्याचे समजते आणि मळमळ आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे उलटी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होणारा हा उलटीचा त्रास कमी करण्यासाठी किंवा होऊच नये यासाठी कोणते घरगुती उपाय केल्यास उपयोग होईल पाहुया...

(Image : Google)

१. आल्याचा तुकडा - प्रवासात आपल्याला डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला निघताना तोंडात एक लहान आल्याचा तुकडा ठेवा, यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो. आल्याऐवजी तुम्ही आलेपाक किंवा आल्याची वडीही खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला उलटी आणि मळमळ यांपासून आराम मिळण्यास उपयोग होईल. 

२. पुदीना - पुदीना ही औषधी वनस्पती असल्याचे आपल्याला माहित आहे. आपण आहारातील अनेक गोष्टींत पुदीन्याचा वापर करतो. तसेच प्रवासासाठी जात असताना तुम्ही पुदिनाच्या रसाचे काही थेंब रुमालावर घेऊन त्याचा वास घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. तसे करायचे नसल्यास पुदीन्याचा चहा घेतल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

३. आवळा - ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशांना प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आवळा सुपारी, आवळा कँडी सोबत ठेवावी. या गोष्टी चघळल्यास यामुळे उलटी आणि मळमळ काही प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच आवळा हा आरोग्यासाठी अतिशय चांगला असल्याने त्याचा दुहेरी फायदा होतो. 

४. वेलची आणि लवंग - वेलची आणि लवंगाला एकप्रकारचा स्वाद असतो. तसेच या दोन्ही पदार्थांमुळे पचनाच्या समस्या आटोक्यात ठेवायला मदत होते. त्यामुळे प्रवासादरम्यान खाल्लेले अन्न वर आल्यासारखे वाटत असेल तर वेलची आणि लवंग चघळल्यास फायदा होतो. तसेच चघळण्याची क्रिया सुरु असल्याने आपले उलटी होते या गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि उलटीचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सट्रॅव्हल टिप्स